Gold Silver Rate : सोनं-चांदी स्वस्त झालं की महाग? वाचा तुमच्या शहरातील दर By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:14 PM 2024-08-05T13:14:29+5:30 2024-08-05T13:48:58+5:30
Gold Silver Rate :श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात बदल झाले आहेत. Gold Silver Rate : आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये ७० ते ७१ हजारांच्या दरम्यान आहे. तर चांदी ८५,४०० रुपये प्रतिकिलो झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पण मागील आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. तुमच्या शहरात २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत पाहा.
आज दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७० हजार ७२० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ६४,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
मुंबईत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,५७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,६९९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,५७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,९९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,३५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,६२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
उत्तर प्रदेशमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,७२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.