gold silver rate t0day 18 july are surging gold silver pricing high level
Gold Silver Rate: सोनं-चांदी महागले की घसरले, फटाफट चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 02:39 PM2023-07-18T14:39:06+5:302023-07-18T14:42:37+5:30Join usJoin usNext Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ होताना दिसत आहे. Gold Silver Rate: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत सराफा बाजारात आज तेजी पाहायला मिळत असून त्यामुळे सोने-चांदी तेजीसह व्यवहार करत आहेत. Gold Silver Rate: देशातील विविध शहरांमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. जागतिक मागणीत झालेली वाढ आणि चलन बाजारात डॉलरची घसरण याचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत असून या परिणामामुळे सोने आणि चांदी तेजीच्या मार्गावर आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज सोन्याचा भाव तेजीसह व्यवहार करत आहे. त्याच्या किंमतीत 145 रुपये किंवा 0.25 टक्क्यांची ताकद दिसून येत आहे. सोन्याचे दर आज 59280 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने आहे. या खालच्या दरांवर नजर टाकली तर ते 59215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले. वरील दर पाहता तो 59313 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला. या सोन्याच्या किमती त्याच्या ऑगस्ट फ्युचर्ससाठी आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीचा भाव 250 रुपयांच्या वर आहे. आज चांदी 257 रुपये किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून 75824 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. चांदीचा भाव खालच्या बाजूला 75714 रुपये प्रति किलो आणि वरच्या बाजूला 75899 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. चांदीची ही पातळी त्याच्या ऑगस्ट फ्युचर्ससाठी आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर कायम आहे. मुंबईत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 120 रुपयांनी वाढून 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 160 रुपयांनी वाढून 60,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 120 रुपयांनी वाढून 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.टॅग्स :सोनंचांदीGoldSilver