Gold Silver Rate : दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोनं झालं स्वस्त; पटापट तपासा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:43 PM2023-11-06T12:43:58+5:302023-11-06T14:06:52+5:30

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

धनत्रयोदशीचा सण १० नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदीला मोठा मान असतो. धनत्रयोदशीच्या आधी, आज सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातू फ्युचर्स मार्केट आणि किरकोळ सराफा बाजारात स्वस्त झाले आहेत.

सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आगामी सण आणि लग्नसराईसाठी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याच्या किमती २०० रुपयांनी कमी झाल्या आहेत आणि MCX वर सोने २४२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्याचा दर ६०७७८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. सोन्याच्या या किमती त्याच्या डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.

चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. MCX वर चांदी ९८ रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि ७२१५४ रुपये प्रति किलो दराने आली आहे. या किमती डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.

किरकोळ बाजारातही आज सोने स्वस्त झाले असून येथील बाजारात सोने १२० ते १७० रुपये प्रति १० ग्रॅम इतक्या कमी दराने उपलब्ध आहे.

मुंबईत आज सोनं १७० रुपयांनी कमी होऊन ६१४७० रुपयांवर पोहोचले आहे. दिल्लीत सोने कोणत्याही बदलाशिवाय ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहे. कोलकाता येथे सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.

अहमदाबादमध्ये सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१५२० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. बेंगळुरूमध्ये सोने १५० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. चंदीगडमध्ये सोने कोणत्याही बदलाशिवाय ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहे.

हैदराबादमध्ये सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. सोने कोणत्याही बदलाशिवाय ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहे.