gold silver rate update today 26 april gold bullion rate silver rate today gold jewellery rate
Gold Silver Rate Update: सोनं-चांदीचे भाव गडगडले? फटाफट चेक करा आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:32 PM2023-04-26T12:32:34+5:302023-04-26T12:36:04+5:30Join usJoin usNext गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे भाव महागले आहेत. Gold Silver Rate Update: गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीचे भाव स्थिर आहेत. काल काहीसे दर उतरले होते, पण आज पुन्हा सोन्या -चांदीच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. तुम्ही जर आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिसा आणखी खाली करावा लागणार आहे. आज फ्युचर्स मार्केटमध्ये, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव घसरणीसह कायम आहे. सोने सध्या ६९ रुपयांनी किंवा ०.११ टक्क्यांनी घसरून ६०१९२ रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे. आज, वरच्या बाजूला ६०२२३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि खाली ६०१२२ रुपये असे दर दिसत होते. सोन्याच्या या किमती त्याच्या मे फ्युचर्ससाठी आहेत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात सुमारे २३० रुपयांची वाढ दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये ब्राइट मेटल चांदी आज २२९ रुपये वाढीसह व्यवहार करत आहे. आज चांदीचा दर ७४४९२ रुपये किलो दराने होत आहे. याशिवाय त्याच्या खालच्या स्तरावर किंमत ७४२५० रुपये प्रति किलोपर्यंत घसरली होती आणि वर ७४५९० रुपये प्रति किलो दर दिसत होते. या सोन्याच्या किमती जून फ्युचर्ससाठी आहेत. वायदा बाजारमध्ये सोन्याचे दर रिटेल बाजारमध्ये वाढून सोनं महागलं आहे. दिल्लीत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ११० रुपयांच्या वाढीसह ६१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ११० रुपयांच्या वाढीसह ६१,०४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. Gold Silver Rate Update: चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून ६१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. कोलकात्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून ६१,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver