Gold Price Today: आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:59 PM2023-05-17T13:59:18+5:302023-05-17T14:20:31+5:30

गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मंगळवारी सकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ६१०६६ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आज (१७ मे) सकाळी ६०६१८ रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.

भारतीय सराफा बाजारात आज (मंगळवार) १७ मे २०२३ रोजी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

सोन्याचा भाव ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो ७१ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६०६१८ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेची चांदी ७१७३९ रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मंगळवारी सकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ६१०६६ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आज (१७ मे) सकाळी ६०६१८ रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, ९९५ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी ६०,३७५ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याच वेळी ९१६ शुद्धतेचे (२२ कॅरेट) सोने आज ५५५२६ रुपये झाले आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या (१८ कॅरेट) सोन्याचा भाव ४५,४६४ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, ५८५ (१४ कॅरेट) शुद्धता असलेले सोने आज ३५,४६२ रुपयांवर स्वस्त झाले आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज ७१७३९ रुपये झाला आहे.

भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु GST त्यांच्या किमतींमध्ये समाविष्ट नाही. दागिने खरेदी करताना, करांच्या समावेशामुळे सोने किंवा चांदीचे दर जास्त आहेत.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.