Gold-Silver Rates Today : सोनं-चांदी पुन्हा महागले! फटाफट चेक करा आजचे लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:17 PM2023-03-29T16:17:08+5:302023-03-29T16:25:02+5:30

Gold-Silver Rates Today : सोनं-चांदीने आज पुन्हा उसळी घेतली आहे.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. सोनं-चांदीचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर स्थीर होते.

आज, २९ मार्च २०२३ रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव ५९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो ६९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

राष्ट्रीय स्तरावर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५९१०६ रुपये आहे. तर चांदी ६९६२० रुपये आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी ५८,९६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तो आज सकाळी ५९,१०६ रुपयांवर आला आहे. २४ कॅरेट सोन्याचे भाव आता पुन्हा वाढले आहेत.

आज ९९५ प्युरीटी असलेल्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी ५८,८६९ रुपये झाली आहे.तर ९१६ शुद्धतेचे सोने आज ५४१४१ रुपये झाले आहे.

याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४४३३० वर पोहोचला आहे. ५८५ शुद्धता असलेले सोने महाग होऊन आज ३४५७७ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय एक किलो चांदीचा दर आज ६९६२० रुपये झाला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात किरकोळ आणि किरकोळ कमी होत आहे.

भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या असतात त्यामुळे या दरांमध्ये वाढ होऊ शकते.