सर्व विक्रम मोडत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:35 PM2024-10-23T14:35:14+5:302024-10-23T14:44:07+5:30

आज जीएसटी सह 10 ग्रॅम सोन्याचा दर 81000 पार पोहचला आहे. तर, चांदी 102125 रुपयांवर पोहोचली आहे.

सोन्या-चांदीचे दर सध्या आकाशाला भिडले आहेत. दिवाळीपूर्वीच सोने पुन्हा एकदा ऑलटाइम हायवर पोहोचले आहेत. आज जीएसटी सह 10 ग्रॅम सोन्याचा दर 81000 पार पोहचला आहे. तर, चांदी 102125 रुपयांवर पोहोचली आहे. या वर्षात सोन्याचा दर तब्बल 15351 रुपये तर चांदीने 25756 रुपयांची उसळी घेतली आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 452 रुपये प्रति 10 ग्रॅम ने वाढून 78703 रुपयांच्याही पुडे गेला आहे. तर, चांदी 779 रुपये प्रति किलोने वाढून 99151 रुपये प्रति किलोवर खुली झाली.

सोने आणि चांदीचे हे दर IBJA ने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नाही. यामुले आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या किमतीत 1000 ते 2000 रुपयांपर्यंत फरक असू शकतो.

या वर्षात 15351 रुपयांनी महागले सोने - या वर्षात सोने 15351 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. IBJA नुसार, 1 जानेवारी 2024 रोजी जीएसटीशिवाय 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63352 रुपये होती. तर, याच कालावधीत चांदीचा भाव 73395 रुपयांवरून 99151 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत यात 25756 रुपयांची वाढ झाली आहे.

14 ते 23 कॅरेट गोल्डची किंमत - आज 23 कॅरेट सोन्याचा दर 450 रुपयांनी वधारून 78388 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 414 रुपयांनी वाढून 72092 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

दुसऱ्या बाजूला, 18 कॅरेट सोन्याचा दर आज 339 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 59027 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला. तर 14 कॅरेट सोन्याचा दर आज 264 रुपयांनी वाढून 46041 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला.

जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर - 24 कॅरेट सोन्याचा दर आता GST सह 81064 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. यात 2361 रुपयांचा जीएसटी समाविष्ट आहे. तर 23 कॅरेट सोन्याची किंमत जीएसटीसह 80739 रुपये आहे. यात 3% GST (2351 रुपये) समावेश आहे.

22 कॅरेट सोन्याच्या दरासंदर्भात बोलायचे झाल्यास आज तो GST सह 74254 रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये 2162 रुपये GST चा समावेश आहे. तसेच जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव 102125 रुपयांवर पोहोचला आहे.