gold in temples and religious trusts can be used during coronavirus to boost indian economy rkp
देशातील मंदिरांकडे सोनंच सोनं... पण, कोरोनाचा सामना करण्यासाठी आहे का पुरेसं? By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 04:11 PM2020-05-26T16:11:03+5:302020-05-26T17:00:06+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारला सल्ला दिला होता. यामध्ये सध्याच्या काळात कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातील मंदिरांमध्ये असलेले सोने सरकार घेऊ शकेल, असे म्हटले होते. यानंतर, अनेकांनी वक्फ बोर्ड आणि कॅथोलिक संस्थांकडे जमा असलेले पैसे आणि सोने का वापरले जाऊ नये, असा सवालही उपस्थित केला. मात्र, सद्यस्थितीत सरकारने कोणत्याही धार्मिक संस्थांविषयी काहीही सांगितले नाही. दरम्यान, भारतातील मंदिरांमध्ये देणगीद्वारे जमा झालेले सोने किती आहे, याबाबत माहिती जाणून घेणे नक्कीच औत्सुक्याचे असणार आहे. 2019 मधील वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारताकडे जवळवास 626 टन सोने रिझर्व्ह आहे. त्याचबरोबर, मंदिरांमध्ये सुमारे 2000 टन सोने आहे. जर मंदिरे आणि खासगी मालमत्ता पाहिली तर देशात 22 ते 25 हजार टन सोने आहे. तसे पाहिले तर मंदिरांमधील सोन्याबद्दल भिन्न-भिन्न मते आहेत. काही अंदाजानुसार ते 3 ते 4000 टनांपर्यंत सोने असू शकते. म्हणजेच, कोणत्याही परिस्थितीत हे सोने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिप्पट आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात जवळपास 750 टन सोन्याची आयात होत आहे. त्यामुळे आता असे मानले जात आहे की, यामध्ये धार्मिक संस्थांचे सोने वापरले तर आपल्याला बाहेरून सोने खरेदी करावे लागणार नाही आणि देशाचे पैसे कोठेही जाणार नाहीत. दरवर्षी मंदिरांमध्ये अनेक भाविक सोने अर्पण करतात. तसेच, ते वैयक्तिक गरजांसाठी सुद्धा सोने खरेदी करतात. सोन्याच्या या पुरवठ्यासाठी सरकारला दरवर्षी इतर देशांकडून सोन्याची आयात करावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये गोल्ड मॉनिटायजेशन योजना आणली होती. या योजनेचा मुख्य उद्देश असा होता की, घरांमध्ये ठेवलेले हजारो टन सोने तसेच, धार्मिक विश्वस्तांमध्ये असलेले सोने योग्य प्रकारे वापरले जाऊ शकेल. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, मंदिरात पडून असलेले सोने मृत पैसे आहेत. ते बँकांना देऊन व्याज घ्या. यानंतर काही मंदिरांनी पुढाकार घेतला होता. तिरुपती मंदिराच्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने पंजाब नॅशनल बँकेत सुमारे 1.3 टन सोने जमा केले. तसेच, आणखी काही बँकांमध्ये सोने जमा होते. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनेही त्यावेळी पुढाकार घेतला होता. मात्र, काही मंदिरे या योजनेसाठी पुढे आली नाहीत.टॅग्स :सोनंGold