Good news for Airtel customers; Upon recharging, you will get free high speed data
Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 11:19 PM2021-05-30T23:19:41+5:302021-05-30T23:24:55+5:30Join usJoin usNext Airtel Recharge : कंपनीनं ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना मिळताना दिसत आहे. एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स घेऊन येताना दिसतात. एअरटेलनंदेखील आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना मोफत डेटाही मिळणार आहे. परंतु एअटेलचं रिचार्ज केल्यानंतर काही ठराविक ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. एअरटेलच्या ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर मिळणारा फ्री डेटा हा कूपनच्या माध्यमातून मिळणार आहे. हा डेटा एअरटेल युझर्सच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट होईल. एअरटेलचा मोफत डेटा मिळवण्यासाठी कमीतकमी २१९ रूपयांच्या अनलिमिटेड कॉम्बो प्लॅनचं रिचार्ज करावं लागेल. याशिवाय ग्राहकांना ३९९ रूपये आणि ५९८ रूपयांच्या रिचार्जवरदेखील ६ जीबीपर्यंत मोफत डेटा मिळेल. कंपनीच्या २१९ रूपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅन अंतर्गत रिचार्ज केल्यावर ग्राहकांना अतिरिक्त २ जीबीपर्यंतचा डेटा दिला जातो. तर दुसरीकडे ३९९ रूपयांच्या प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर कंपनी हे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना ४ जीबीपर्यंत डेटा मोफत देते. या प्लॅनची वैधता ५६ दिवसांती आहे. तर ५९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना ६ जीबीपर्यंतचा अतिरिक्त डेटा मोफत देते. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. एअरटेलचे हे तिन्ही प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटासह येतात. तिन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० एसएमएसची सुविधाही मिळते. तसंच २१९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा आणि ३९९ रूपयांच्या आणि ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. जर तुम्हाला या मोफत डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम Airtel Thanks App नं रिचार्ज करावं लागेल. हे एअरटेलचं ऑफिशिअल रिचार्ज अॅप आहे. जर तुमच्याकडे हे अॅप नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमधून ते डाऊनलोड करू शकता. यानंतर कंपनी एका एसएमएसद्वारे ग्राहकाला मोफत डेटाबाबात माहिती पाठवते. Airtel Thanks App मधील My Coupons टॅबमध्ये जाऊन तुम्ही हे मोफत डेटाचं कूपन रिडीम करू शकता. याच ठिकाणी कूपनची एक्सपायरी डेटही तपासू शकता.टॅग्स :एअरटेलरिलायन्स जिओव्होडाफोनआयडियास्मार्टफोनAirtelReliance JioVodafoneIdeaSmartphone