Google Pay अ‍ॅपवर आता 'या' बँकांच्या डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे करू शकता पेमेंट, कार्ड स्वाइप करण्याची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:21 AM2021-06-17T08:21:06+5:302021-06-17T08:32:18+5:30

Google Pay : कार्ड टोकनायझेशन फीचर एक प्रकारे आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डला डिजिटल बनवते.

Google Pay अ‍ॅप आता केवळ यूपीआय पेमेंट करण्यासाठी उपयोगी येणार नाही, तर याच्या कार्ड टोकनायझेशन फीचरमुळे, लोक त्यांच्या बँकांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करूनही पेमेंट करु शकणार आहेत.

यासाठी Google Pay ने नुकतेच बर्‍याच बँकांना हे फीचर जोडले आहे. कार्ड टोकनायझेशन फीचर एक प्रकारे आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डला डिजिटल बनवते.

ज्यामुळे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला हे पीओएस वर स्वाइप करण्याची किंवा टच करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी डिजिटल पद्धतीने पेमेंट केले जाऊ शकते.

कार्ड टोकनायझेशन फिचरमुळे तुम्ही Google Pay अ‍ॅपवरच तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर Tap and Pay, Online किंवा QR Code पासून होणाऱ्या पेमेंटसाठी करू शकतो. हे फीचर तुमच्या फोनला सुरक्षित डिजिटल टोकन म्हणून कार्डशी जोडते.

Google Pay च्या या फिचरमुळे तुम्ही आपल्या फोनवरून अडीच लाखाहून अधिक व्हिसा मर्चेंट लोकेशनवर आपल्या फोनमधून कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी थेट डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकाल.

तसेच, 15 लाखाहून अधिक Bharar QR इनेबल्ड मर्चेंटवर QR Code स्कॅन करुन पेमेंट करू शकता.या फीचरमुळे युजर्स आपले वीज, पाणी किंवा मोबाइल बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरू शकतात.

तुमचा मोबाइल रिचार्ज करू शकता. तुम्ही ऑनलाइन पेमेंट देखील करू शकता आणि यासाठी अ‍ॅप त्यांना स्वतंत्र 3 डी सिक्युर साइटवर रीडायरेक्ट देखील करत नाही.

Google Pay च्या या फीचरमुळे आता SBI, Indusind Bank आणि Federal Bank ची डेबिट कार्ड्स तसेच Indusind Bank आणि HSBC India चे क्रेडिट कार्ड वापरले जाऊ शकतात.

यापूर्वी SBI Cards चे क्रेडिट कार्ड आणि Kotak Mahindra Bank आणि Axis Bank चे डेबिट-क्रेडिट कार्ड या फिचरला जोडण्यात आले आहे.