नेपाळ सरकारनं या कंपनीला दिला ₹143 कोटींचा ठेका, शेअर्सनं घेतला रॉकेट स्पीड; खरेदीसाठी उडाली झुंबड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 09:33 PM2023-01-18T21:33:38+5:302023-01-18T21:38:54+5:30

ही बातमी बाहेर येताच शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला असून खरेदी करण्यासाठीही गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.

देशांतर्गत कंपनी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडने (STEL) बुधवारी आपल्याला नेपाळ सरकारकडून 143 कोटी रुपयांचा ठेका मिळाल्याची माहिती दिली. ही बातमी बाहेर येताच शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला असून खरेदी करण्यासाठीही गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.

कंपनीने शेअर बाजाराला सांगिले की, “हा ठेका 33/11 केव्ही सबस्टेशन आणि 33 केव्ही, 11 केव्ही, 400 व्ही लाइन आणि वितरण प्रणाली नेटवर्कचे डिझाइन आणि निर्मितीसह सामग्री, संबंधित सामान आणि आवश्यक स्थापना सेवांच्या खरेदीसाठी आहे.”

कंपनीच्या शेअरला लागले अपर सर्किट - शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना ही बातमी समजताच कंपनीच्या शेअर्सची किंमत झपाट्याने वाढू लागली. काही वेळांतच कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचे अप्पर सर्किटही लागले.

बुधवारी सायंकाळी बीएसईव कंपनीचा शेअर 4.82 टक्यांच्या तेजीसह 52.15 रुपयांवर पोहोचला. कंपीची 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी 58.30 रुपये एवढी आहे.

नेपाळ विद्युत प्राधिकरणाचे (NEA) हे प्रकल्प शेजारील देशाच्या डांग, रुकुम पूर्व आणि बैतादी जिल्ह्यांत आहेत. हे काम 24 महिन्यांतच पूर्ण केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

STEL व्यवस्थापन संघाचे शशांक अग्रवाल यांनी म्हटले आहे, की, कंपनीला भारताबाहेर हा पहिलाच ईपीसी (इंजिनिअरिंग, खरेदी आणि निर्माण) ठेका मिळाला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)