स्वस्तात घर घेण्याची मस्त संधी, PNB करतेय १२ हजार २३२ घरांची विक्री By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:56 PM 2021-05-25T12:56:55+5:30 2021-05-25T13:02:31+5:30
PNB Mega E-Auction: जर तुम्ही स्वस्तामध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) गृहविक्रीबाबत सध्या एक खास ऑफर आणली आहे. या माध्यमातून तुम्हाला घर खरेदीची उत्तम संधी मिळणार आहे. जर तुम्ही स्वस्तामध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) गृहविक्रीबाबत सध्या एक खास ऑफर आणली आहे. या माध्यमातून तुम्हाला घर खरेदीची उत्तम संधी मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बँक त्यांच्याकडील मालमत्तांची विक्री करण्याची तयारी करत असून, यासाठीचे लिलाव आजपासून सुरू झाले आहे. या सर्व मालमत्ता थकबाकीच्या यादीत आलेल्या आहे. या लिलावाबाबत आयबीएपीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.
पीएनबीकडून ज्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येत आहे त्यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे.
ज्या मालमत्तादारांचे कर्ज थकते. कुठल्याही कारणाने कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही. त्या सर्वांच्या मालमत्ता ह्या बँकांकडून जप्त करून ताब्यात घेतल्या जातात. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव आयोजित केला जातो. या लिलावाच्या माध्यमातून मालमत्ता विकून आपली थकबाकी बँका वसूल करतात.
दरम्यान पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृच संकेतस्थळावर ट्विट करून या लिलावाबाबत माहिती दिली आहे. २५ मे रोजी म्हणजेच आज मेगा ई ऑक्शनच्या माध्यमातून या मालमत्तांचा लिलाव केला जाईल. यामध्ये निवासी आणि वाणिज्यिक मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल.
या लिलावामध्ये १२ हजार २३२ निवासी मालमत्ता, २ हजार ६५९ व्यावसायिक मालमत्ता, १३०८ औद्योगिक मालमत्ता आणि ९५ कृषी मालमत्तांचा समावेश आहे. या सर्व मालमत्तांचा लिलाव बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या मालमत्तांच्या लिलावाबाबतची अधिक माहिती तुम्हाला https://ibapi.in/ या संकेतस्थळारून मिळू शकते. जर तुम्हीही या ई-लिलावामधून मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक असाल तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत कुठल्याही प्रकारची माहिती घेऊ शकता.