गॅरंटीड कमाईवाली PPF की मार्केट लिंक्ड SIP...१५ वर्षात कोणती स्कीम तुम्हाला बनवेल मालामाल? By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:00 AM 2024-04-16T09:00:51+5:30 2024-04-16T09:14:30+5:30
PPF Vs SIP Mutual Fund: भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे हल्ली अनेक जण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता येईल तितक्या लवकर ती सुरू करतात. PPF Vs SIP Mutual Fund: भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे हल्ली अनेक जण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता येईल तितक्या लवकर ती सुरू करतात. साधारणपणे दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. एका असा गुंतवणूकदार असतो, ज्याला धोका पत्करायचा नसतो. त्यांना आपले पैसे सुरक्षित असतील आणि खात्रीशीर परतावा मिळेल अशा ठिकाणीच गुंतवणूक करायला आवडते. तर दुसरा गुंतवणूकदार असाही असतो, जो जोखीम पत्करून अधिक परतावा मिळवण्यास तयार असतो.
पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळे पर्याय आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक दीर्घकालीन योजना आहे जी सरकारने विशेषतः अशा लोकांसाठी तयार केली आहे ज्यांना सुरक्षित आणि हमी परताव्यासह मोठा पैसा गुंतवायचा आहे.
तर म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाते. ही योजना थोडीशी जोखमीची आहे कारण ती बाजाराशी जोडलेली असते. परंतु दीर्घ मुदतीत या योजनेत खूप चांगला परतावा परतो. PPF आणि SIP शी संबंधित वैशिष्ट्ये आणि यापैकी कोणत्या योजना 15 वर्षांमध्ये चांगले परतावा देऊ शकतात ते आपण पाहूया.
पीपीएफची वैशिष्ट्ये - ही स्कीम १५ वर्षांनी मॅच्युअर होते. मॅच्युरिटीनंतर ५-५ वर्षांसाठी याला मुदतवाढ दिली जाऊ शकते. यावर ७.१ टक्के दरानं व्याज मिळतं. यावर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळल्यानं रक्कम अधिक मिळते.
या स्कीममध्ये वर्षाला किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. कर बचतीच्या पीपीएफ खूप चांगले मानले जाते. हे गुंतवणूकीच्या EEE श्रेणीमध्ये येते. हे खातं सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं.
एसआयपीची वैशिष्ट्ये - ही स्कीम मार्केट लिंक्ड असते. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक केली जाते. स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा हे कमी जोखमीचं मानलं जातं. यामध्ये तुम्हाला रुपी कॉस्ट एव्हरेजींगचा फायदा मिळतो. त्यामुळे मार्केट घसरलं तरी तुम्ही जास्त नुकसानीत जात नाहीत. मार्केट लिंक्ड असल्यामुळे, एसआयपीमध्ये खात्रीशीर परतावा मिळत नाही, परंतु त्याचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो.
एसआयपी १०० आणि ५०० रुपयांपासून सुरू होऊ शकते, यावर कमाल गुंतवणुकीला मर्यादा नाही. यात निश्चित परिपक्वता कालावधी नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते कमी-अधिक कालावधीसाठी चालवू शकता. आपण ते कधीही थांबवू किंवा बंद करू शकता. एसआयपीमध्ये चक्रवाढीचा लाभही मिळतो. एसआयपी जितकी जास्त असेल तितका चक्रवाढीचा फायदा होईल.
५००० च्या गुंतवणुकीवर किती फायदा? जर तुम्हाला पीपीएफ आणि एसआयपी या दोन्हीचे रिटर्न समजून घ्यायचे असतील, तर तुम्ही या कॅलक्युलेशनमधून समजून घेऊ शकता. समजा तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा ५००० रुपये आणि एसआयपीमध्ये दरमहा तीच रक्कम गुंतवली. तुम्ही दोन्ही एकूण १५ वर्षे चालू ठेवल्यास, तुमची दोन्हीमधील गुंतवणूक सारखीच असेल. तुम्ही वार्षिक ६० हजार रुपयांची गुंतवणूक कराल, अशा प्रकारे १५ वर्षांत दोन्ही स्कीम्समध्ये एकूण ९,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल.
परंतु तुम्हाला PPF वर १५ वर्षात ७.१ टक्के दरानं एकूण व्याज मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम १६,२७,२८४ रुपये असेल. त्याच वेळी, १२ टक्के दरानं, तुम्हाला १५ वर्षांत एसआयपीमध्ये फक्त १६,२२,८८० रुपये मिळतील. यात, तुम्हाला १५ वर्षांनंतर एकूण २५,२२,८८० रुपये मिळतील. (टीप - यामध्ये केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)