Half the staff will leave the job instead of going back to the office corona Read what survey said
पुन्हा ऑफिसला जाण्याऐवजी अर्धे कर्मचारी सोडणार नोकरी; वाचा सर्वेक्षणातून काय आलं समोर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 12:57 PM2021-10-02T12:57:46+5:302021-10-02T13:07:07+5:30Join usJoin usNext कोरोनाची भीती कायम; घरासाठी वेळही देणार ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय झालेले कर्मचारी पुन्हा कार्यालयात जाऊन काम करण्यास नाखुश असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कंपनीने कार्यालयात येऊन काम करायला सांगितल्यास आपण नोकरी सोडण्यास तयार असल्याचे तब्बल ५८ टक्के लोकांनी या सर्वेक्षणात सांगितले. कोविड-१९ साथीचा उद्रेक झाल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ला सुरुवात झाली होती. मागील सुमारे दोन वर्षांपासून असंख्य कंपन्यांचे कर्मचारी घरून काम करीत आहेत. आयटी कंपन्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. आता लाट ओसरत आल्यामुळे कंपन्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून घेण्याची तयारी चालविली आहे. तथापि, कर्मचारीच आता कार्यालयातून काम करण्यास इच्छुक नसल्याचे समोर येत आहे. ‘फ्लेक्सजॉब्स’ या संस्थेने यासंबंधी केलेल्या सर्वेक्षणातून चकित करणारी माहिती समोर आली आहे. पुन्हा कार्यालयांत परतण्यास केवळ २ टक्के कर्मचाऱ्यांनी पसंती दिली आहे. बाकी सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू राहावे, असे वाटते. साथ पूर्णत: संपल्यानंतरही घरून काम करण्यास आवडेल, असे ६५ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी तर म्हटले की, ‘कंपनी वर्क फ्रॉम होम’ कायम ठेवणार नसेल, तर दुसरी नोकरी शोधू.’ सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य मिळण्यामागे कोविड-१९ ची न संपलेली भीती हे एक प्रमुख कारण आहे. कार्यालयात जाऊन काम केल्यास आपल्याला कोविड-१९ चा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती ४९ टक्के उत्तरदात्यांनी व्यक्त केली. अनेकांना वाटते की, घरून काम होत असेल, तर कार्यालयात पोहोचण्यासाठी लागणारा वेळ का व्यर्थ घालवावा? घरून काम सुरू झाल्यापासून अनेकांचे प्रवासातील दोन-दोन तास वाचले आहेत. त्यांना हा वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत व्यतीत करता येतो.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापरिवारघरcorona virusFamilyHome