Harley Davidson's 'shutdown' in India, employees unemployed
हार्ले डेविडसनचं 'भारतात शटडाऊन', कर्मचारी बेकार By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 07:39 PM2020-09-24T19:39:12+5:302020-09-24T19:44:10+5:30Join usJoin usNext भारतातील हार्ले डेविडसन कंपनीच्या बाईक खरेदीदारांसाठी निराशाजनक बातमी आहे. कंपनीने भारतातील आपला उद्योग बंद केला आहे. कंपनीने The Rewire प्रोग्रामअंतर्गत भारतातील उत्पादन आणि सेल्स कॉर्पोरेशन पूर्णपणे बंद केले आहे. हरियाणातील शहर बावल येथील उत्पादन कंपनीने आजपासून बंद केले आहे. भारतात गेल्या 10 वर्षात कंपनीने मोटारसायकल्सचे एकूण 30,000 युनिट्स विकले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने केवळ 2,500 दुचाकी गाड्यांची विक्री भारतात केली आहे. भारतीय बाजारात कंपनीचा नफा अतिशय कमी होत होता, त्यामुळे नुकसानीत जाण्यापूर्वीच कंपनीने हा निर्णय घेतला आहे हार्ले डेविडसन कंपनीकडून लवकरच भारतातील एका दुचाकी कंपनीसोबत पार्टनरशीप करण्यात येऊ शकते. हिरो मोटरकॉर्प कंपनीसोबत लवकरच हार्ले डेविडसनची भागिदारी होईल, अशी सुत्रांची व तज्ज्ञांची माहिती आहे. कंपनीने भारतातील उत्पादन बंद केले असले तरी, देशातील ग्राहकांसाठी सेवा सुरूच राहणार असल्याचे कंपनीने म्हटलंय. कंपनीकडून बिझनेस मॉडेल बदलण्यात येत आहे, त्यामुळे केवळ दुचाकी गाड्यांचं उत्पादन बंद करण्यात आल्याचं कंपनीने अधिकृतपणे सांगितलं आहे. हरयाणातील बवालमध्ये या कंपनीचं अॅस्मेबली युनिट आहे. जवळपास 70 कर्मचारी आता बेरोजगार होतील. टॅग्स :हार्ले डेव्हिडसनहरयाणाबाईकHarley-DavidsonHaryanabike