HDFC नं वाढवले FD वरील व्याजदर; मिळणार चांगले रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:32 PM2021-04-02T13:32:40+5:302021-04-02T13:47:35+5:30

३० मार्चपासून नवे व्याजदर लागू करण्यात आले आहेत.

होम लोन देणारी कंपनी HDFC लिमिटेडनं आपल्या बँकेत ठेवण्यात येणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिटवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे.

एच़डीएफसी लिमिडेटनं आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवे व्याजदर ३० मार्च पासून लागू करण्यात आले आहेत.

एकीकडे काही बँका आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी करत आहेत. तर दुसरीकडे मात्र एचडीएफसी बँकेनं हे व्याजदर वाढवले आहेत.

एचडीएफसीनं दिलेल्या माहितीनुसार ३३ महिन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या २ कोटी रूपयांपर्यंतच्या एफडीवर वर्षाला ६.२० टक्के व्याज मिळणार आहे.

तर ६६ महिन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या एफडीवर ६.६० टक्के आणि ९९ महिन्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर ६.६५ टक्के व्याज देण्यात येईल.

याबाबत एक प्रमुख बाब म्हणजे हे व्याजदर एचडीएफसी बँकेचे नसून होम लोन देणारी कंपनी एचडीएफसी लिमिटेडच्या एफडीसाठी आहे. या एफडी कॉर्पोरेट एफडीच्या श्रेणीत येतात.

कॉर्पोरेट एफडीवर रिटर्न चांगले मिळतात. परंतु बँकांच्या तुलनेत यात जोखीम अधिक पत्करावी लागते.

एचडीएफसीकडे गेल्या २५ वर्षांपासून क्रिसिल आणि आयसीआरए दोन्हीची AAA रेटिंग आहे.

या एफडीची निवड करण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहा महिने आणि वार्षिक असे पर्यायही मिळतात.

कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट डीआयसीजीसी विमाद्वारे कव्हर केले जात नाहीत. परंतु बँक एफडीमध्ये पाच लाखांपर्यंत विमा कव्हर मिळतं.

Read in English