Personal Loan मिळेल सर्वात स्वस्त! बँक इच्छा असूनही नकार देऊ शकणार नाही, फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:39 PM2024-10-27T16:39:26+5:302024-10-27T16:42:22+5:30

Personal Loan : प्रत्येकाला कधी ना कधी कर्जाची गरज असते. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा आपला पहिला प्रयत्न असतो की व्याजदर शक्य तितक्या कमी ठेवण्याचा. जर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज हवे असेल तर तुम्हाला त्यासाठी आधीच तयारी करावी लागेल. अतिशय कमी व्याजदरात Personal Loan मिळवण्यासाठी तुम्हाला या 5 टिप्स मदत करतील.

जर तुम्हाला परवडणाऱ्या दरात कर्ज हवे असेल तर तुम्ही चांगला क्रेडिट स्कोअर राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला तेवढ्या कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज मिळू शकेल. चांगला क्रेडिट स्कोअर करण्यासाठी तुम्ही तुमची बिले वेळेवर भरली पाहिजेत. कुठलाही हप्ता चुकून देऊ नका.

जर तुम्हाला लहान कर्ज हवे असेल तर तुम्ही बँकाची तुलना न करता घेऊ शकता. कारण त्यासाठी खूप वेळ लागतो. पण जर तुम्ही थोडे मोठे कर्ज घेत असाल तर आधी काही बँकांची तुलना करा. तुलना करताना, फक्त व्याजदर बघू नका, तर इतर छुपे शुल्क देखील पहा. बँक किती प्रोसेसिंग फी आकारत आहे. व्याज दर निश्चित आहे किंवा शिल्लक कमी करण्यावर किंवा इतर कोणतेही शुल्क आकारले जात आहे का? या गोष्टी विचारुन घ्या.

जेव्हा तुम्ही विविध बँकांच्या कर्जाची तुलना करता. तेव्हा तुम्ही व्याज दराबाबत बँकांशी बोलणी करू शकता. बँकेशी सौदेबाजी करताना अजिबात संकोच करू नका. बार्गेनिंग करून तुम्हाला अधिक चांगल्या दराने कर्ज मिळण्याची शक्यता असते.

जर तुम्ही पर्सनल लोन घेत असाल तर तुम्ही योग्य प्रकारचे कर्ज घेत आहात का? याचा विचार करा. सुरक्षित कर्जाचे व्याजदर असुरक्षित कर्जापेक्षा कमी असतात. त्यामुळे शक्य असल्यास फक्त सुरक्षित कर्ज घ्यावे, जेणेकरून तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल. तुम्ही तुमच्या FD, म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीवर सुरक्षित कर्ज घेऊ शकता.

बऱ्याचदा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दीर्घ कालावधीसाठी EMI केल्यास कमी व्याजदराची ऑफर दिली जाते. मात्र, इथं एक गोष्ट समजून घ्या की कमी व्याजदराचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी व्याज देत आहात. याचे कारण म्हणजे तुम्ही कमी व्याज देण्याऐवजी दीर्घ कालावधीसाठी कमी दराने व्याज देणार आहात. अनेकवेळा हे कर्ज महाग पडते.