High consumption of lipstick means recession; What is the Connection between recession and lipstick?
लिपस्टिकचा जास्त खप, त्याचा अर्थ मंदी येतेय; नेमकं मंदी आणि लिपस्टिकचा काय संबंध? By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:30 AM2024-09-02T11:30:49+5:302024-09-02T11:37:27+5:30Join usJoin usNext अमेरिकन बाजारात सध्या मंदीचं सावट आहे. एकीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना देशाचा नवा राष्ट्रपती कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. परंतु अमेरिकन शेअर बाजाराची चांगली स्थिती नाही. त्यात एका बातमीनं अमेरिकेत गुंतवणुकदारांच्या चिंतेत भर टाकली आहे. अमेरिकन सोशल मीडियावर लिपस्टिक चर्चेचा विषय बनली आहे. लिपस्टिक आणि अमेरिकन बाजाराचं काय नाते आहे, लिपस्टिक चर्चेत येण्यामागचं कारण काय हे जाणून घेऊया. लिपस्टिक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे बर्कशायर हॅथवेचे मालक वॉरेन बफेट, जे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आहेत. त्यांच्याविषयी असं बोललं जातं की, त्यांनी केलेली गुंतवणूक अमेरिकन बाजाराची एकप्रकारे लिटमस टेस्ट मानली जाते. वॉरेन बफेट हे जर एखाद्या कंपनीत पैसे गुंतवत असतील किंवा गुंतवलेले पैसे काढून घेत असतील तर त्यावरून अमेरिकन शेअर बाजारातील परिणामांचा अंदाज लावला जातो. त्यातच वॉरेन बफेट यांनी एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. अमेरिकेत अनेक प्रमुख इकोनॉमिक इंडिकेटर्समध्ये मंदीचे संकेत दिसतायेत. बेरोजगारी दर जानेवारीपासून घसरत आहे. जुलैमध्ये बेरोजगारी दर ३ वरून ४.३ टक्क्यांवर पोहचला. त्यातच वॉरेन बफेट यांनी एका कॉस्मेटिक कंपनीत गुंतवणूक केली. विशेष म्हणजे, मंदीच्या काळात लिपस्टिकच्या विक्रीत वाढ होते असं बोलतात. त्यामुळे मंदीचा अंदाज बफेट यांनी लावला असावा. त्यातूनच नफा मिळविण्यासाठी त्यांनी कॉस्मेटिक कंपनीत गुंतवणूक केली आहे. काय आहे लिपस्टिक इंडेक्स? - या टर्मचा वापर एस्टी लॉडरचे अध्यक्ष लिओनार्ड लॉडर यांनी वापरली होती. लिओनार्ड लॉडर हे एक मोठे अमेरिकन गुंतवणूकदार आहे. २००० च्या मंदीच्या काळात महिलांच्या लिपस्टिकची विक्री वेगाने वाढली आहे. अमेरिकेत १९२९ ते १९३३ पर्यंत अमेरिकेतील महामंदीच्या काळातही महिलांच्या लिपस्टिकची विक्री झपाट्याने वाढली होती. २००८ च्या जागतिक मंदीनंतरही असेच काहीसे दिसून आले होते. त्यामुळे यामागे खूप अभ्यास केला गेला. या स्टडीतून चांगल्या आर्थिक परिस्थितीत महिला अधिक कपडे खरेदी करतात तर बिकट आर्थिक परिस्थितीत महिला लिपस्टिक खरेदीवर जास्त जोर देतात. लिपस्टिक इफेक्टशी निगडीत तज्ज्ञ सांगतात की, कठीण काळात महिला स्वत: चांगले दिसण्यासाठी स्वस्त परंतु आकर्षक सौंदर्य उत्पादन खरेदीवर भर देतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी सोपा आणि कमी खर्चिक हा मार्ग आहे. मंदीच्या काळात कॉस्मेटिक कंपन्यांना इतका जास्त फटका बसत नाही जितका अंदाज लावला जातो. त्यामागेही प्रमुख लिपस्टिक विक्री असल्याचं अभ्यासातून पुढे आले आहे. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश आर्थिक संकटात गेला. त्याकाळातही रिसर्चनुसार, लिपस्टिक विक्रीत दुप्पट फायदा झाला होता. २००७ ते २००९ या काळातील आर्थिक मंदी जी १९ महिने चालली, त्यात लाखो अमेरिकन बेरोजगार झाले. त्या संकटातही लोरियल, एस्टी लॉडरसारख्या प्रमुख कॉस्मेटिक कंपन्यांनी चांगला नफा कमावला होता. १९२९ ते १९३३ याकाळातही तेच पाहायला मिळाले. लिपस्टिक विक्रीत वाढ झाली परंतु इतर महागडे कॉस्मेटिक विक्री कमी झाली. टॅग्स :शेअर बाजारअर्थव्यवस्थाअमेरिकाshare marketEconomyAmerica