High Return Stock : महिन्याभरातच रक्कम झाली दुपटीपेक्षाही अधिक, 'या' शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:19 PM2022-01-27T22:19:39+5:302022-01-27T22:23:26+5:30

गेल्या काही दिवसांपासून स्मॉल कॅप शेअर्सनं चांगले रिटर्न्स दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market BSE NSE) मोठी घसरण दिसून आली आहे. चांगल्या चांगल्या शेअर्सनाही मोठा फटका बसला आहे. परंतु गेल्या एका महिन्यात अनेक स्मॉल कॅप शेअर्सनं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत.

असाच एक शेअर आहे तो म्हणाले झोडिअॅक एनर्जी (Zodiac Energy) या कंपनीचा. गेल्या महिन्यात Zodiac Energy च्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. Zodiac Energy चे शेअर्स एका महिन्यात १७७ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत

२८ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई शेअर बाजारावर (BSE) वर Zodiac Energy चे शेअर्स ५१.९५ रुपयांच्या पातळीवर होते. २७ जानेवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर १४३.९० रुपयांवर बंद झाले.

कंपनीच्या शेअर्सनं एका महिन्यात १७७ टक्के रिटर्न्स दिले. जर एखाद्या गुंतवणूकदाराने २८ डिसेंबर रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर २७ जानेवारी २०२२ रोजी त्याचे मूल्य २.७६ लाख रुपये झाले असते. म्हणजेच एका महिन्यात १.७६ लाख रुपयांचा नफा झाला असता.

झोडिअॅक एनर्जीच्या शेअरनं गेल्या सहा महिन्यांमध्ये जबळपास ३६० टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. ६ महिन्यांच्या कालावधीत कंपनीचे शेअर ३२.१० रुपयांवरून वाढून १४३.९० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

कामकाजाच्या गेल्या पाच सत्रांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप २१० कोटी रुपयांचं आहे. गेल्या ५२ आठवड्यात कंपनीच्या शेअरनं ३२.१० रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता.