Home Loan: जुनं लोन फेडण्यासाठी घेत असेलेलं नवं लोन ठरू शकते समस्या, पाहा संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:23 AM2023-08-16T09:23:18+5:302023-08-16T09:30:56+5:30

सध्या सुरू असलेलं लोन फेडण्यासाठी नवं लोन घेण्याचा पर्याय अनेक वित्तीय संस्था आणि बँका सहजरित्या देत आहेत.

सध्या सुरू असलेलं लोन फेडण्यासाठी नवं लोन घेण्याचा पर्याय अनेक वित्तीय संस्था आणि बँका सहजरित्या देत आहेत. यालाच डेट कंसोलिडेशन (Debt Consolidation) असं म्हटलं जातं. हे तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुलभ करण्यात आणि व्याजाच्या पेमेंटवर पैसे वाचविण्यात मदत करू शकते.

परंतु काहीवेळा परिस्थितीत उलटही होऊ शकते. दरम्यान, कंसोलिडेशनसाठी लोन घेण्यापूर्वी बहुतांश ग्राहक बँकेच्या अटी आणि शुल्कासंबंधिची माहिती नीट समजून घेत नाहीत. यामुळे ते लोन वास्तविकरित्या कंसोलिडेशनचा पर्याय देणाऱ्यांच्या एकूण खर्चाला कमी करण्याऐवजी वाढवण्याचं काम करते.

यामध्ये तुम्हाला नवीन लोन कमी रेट ऑफ इंटरेस्टवर मिळतं आणि कमी ईएमआय घेण्यासही मदत करतं. यामध्ये लोन मॅनेजमेंट आणि ते तेजीनं फेडणं शक्य होतं. परंतु डेट कंसोलिडेशनसाठीट कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या नियम, अटी आणि शुल्काबद्दल माहिती समजून घेतली पाहिजे, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नमूद केलं.

दरम्यान, हे लोन तुमचा किती खर्च कमी करेल हे पाहून घ्या. अन्यथा तुमच्यावर एक नवं देणं देण्याचं टेन्शन वाढेल आणि बहुतेकदा बँकांना यात मोठा फायदा होईल. बँका यासाठी कायमच तयार असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जर तुम्ही अधिक व्याजदरावर क्रेडिट कार्ड लोन घेतलं असेल तर अशात कंसोलिडेशन चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला मिळणारा कमी व्याजदर हा फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही यामध्ये व्याजाचे पैसे वाचवू शकता. यामध्ये तुमचा बॅलन्स ट्रान्सफर जोडू शकता, असं आणखी एका तज्ज्ञांनी नमूद केलं.

बॅलन्स ट्रान्सफर अंतर्गत क्रेडिट कार्ड लोनला एका कार्डातून दुसऱ्या कार्डात ट्रान्सफर करता येतं. जर तुम्हाला सहा महिन्यांसाठी शून्य टक्के व्याजदर असलेलं कार्ड मिळालं तर याचा उपयोद क्रेडिट कार्ड लोनला कंसोलिडेट करणं आणि व्याज फेडण्यासाठी करू शकता, असंही त्यांनी नमूद केलं.

कंसोलिडेट होण्यावर कमी व्याजदरावर नवं कर्ज ऑफर केलं जातं आणि त्यात तुम्हाला अनेक रिपेमेंटचे पर्याय मिळतात. बँक बाझार डॉट कॉमचे आदिल शेट्टी यांच्यानुसार कंसोलिडेशनमध्ये जर दोन होम लोन असतील तर त्यात तुमचे भरपूर पैसे वाचू शकतात. जेव्हा होम लोन व्याजदर अधिक असेल आणि हायर इंटरेस्ट फेडण्यासाठी कोणतंही अतिरिक्त इन्कम नसेल तर तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफर पर्यायाचा वापर करून दोन होम लोन एकात कंसोलिडेट करू शकता.

लोन कंसोलिडेशनमध्ये बँक सर्व प्रकारच्या लोनला कंसोलिडेट करण्याचा पर्याय देतात. परंतु त्यांचं अधिक स्वारस्य पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनमध्ये असतं. परंतु कार किंवा होमलोनमध्ये त्यांचं स्वारस्य अधिक नसतं. अशात ग्राहकांना बँकांसोबत बोलून हे माहित करून घेणं आवश्यक आहे की तुम्ही जर नवं लोन घेत असाल त्यात कोणत्याही प्रकारचा क्लोजर चार्ज असू नये.