Home Loan Vs Rent: कर्जावर घर घेणे नुकसानीचा सौदा; भाड्याने रहाल तर पैशांचा 'किंगमेकर' बनाल, जाणून घ्या गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:57 PM2022-12-06T19:57:10+5:302022-12-06T20:03:06+5:30

Home Loan Disadvantages: अनेकजण इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतात, परंतू तिथल्या किंमतीच त्या प्रमाणावर वाढत नाहीत.

घर खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्या लोकांचा कल गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्यावर आहे. जेवढे तुम्ही कर्ज घेता त्यापेक्षा दुप्पट रक्कम तुम्हाला व्याजाच्या स्वरुपात फेडायची असते. यासाठी १५, २० ते ३० वर्षांचा काळ लागतो. त्यातून एखाद्याला लागली तर लॉटरी लागते आणि नाही लागली तर तेवढी किंमतही मिळत नाही.

अनेकजण इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतात, परंतू तिथल्या किंमतीच त्या प्रमाणावर वाढत नाहीत. यामुळे तोट्याचा सौदा ठरू लागतो. काहींना तर कर्ज, व्याज आणि मोजलेली रोख कॅश यांची एकूण जी रक्कम होते त्यापेक्षाही कमी किंमतीत घर विकावे लागते. मग काहींना घराच्या किंमतीच्या तिप्पट, चौपट काय १० पट पण किंमत मिळते. हे शेवटी नशिबावर असल्याचे जरी म्हटले तरी भाड्याने राहण्यामुळे तुम्ही हमखास करोडपती बनू शकता.

जे व्यावहारिक विचार करतात ते तुम्हाला घर भाड्याने घेण्यासच सांगतील. कारण त्यातून जे तुमचे मेन्टेनन्स, व्याज आणि ब्लॅकने द्यायची रोख रक्कम आदी वाचतील ते तुम्हाला कुठेतरी गुंतवता येतील. त्यातून तुम्ही याच १५, २०, ३० वर्षांत मोठा निधी जमा करू शकता. कसे ते पाहुया...

तुम्ही जर घर विकत घेत असलात तर तेथील लोकेशन महत्वाचे असते. त्या घराच्या किंमतीवर तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उदा. ट्रेन, बस आदी., वैद्यकीय सुविधा आणि अन्य गोष्टी परिणाम करतात.

जर तुम्ही खासगी कंपनीत काम करत असाल आणि घर घ्यायचा विचार करत असाल तर... त्या फ्लॅटची किंमत ३५ लाख रुपये पकडुयात. त्यासाठी डाऊनपेमेंट ५-६ लाख रुपये असेल. याशिवाय स्टँप ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस आणि ब्रोकरेज आदी गोष्टींचा अधिकचा खर्च असतो. हा खर्च ५-६ लाख रुपये पकडुया. म्हणजेच तुम्हाला एकूण खर्च ४० लाख रुपयांचा असेल.

बँकेत तुम्ही कर्जासाठी गेलात तर तुम्हाला ३० लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्याचे व्याजासह परतफेडीची रक्कम ६० लाख रुपये धरुयात. ८ टक्क्यांनी व्याजदर पकडला तर २० वर्षांसाठी तुम्हाला २५ हजार रुपये ईएमआय बसेल. शिवाय १० लाखांची रक्कम खर्च झालीय ती वेगळीच.

भाड्याच्या घरात राहिलात तर त्या घरासाठी तुम्हाला ८ ते १० हजार रुपये भाडे असेल. म्हणजेच ईएमआयच्या रकमेत तुम्ही १५ हजार रुपये वाचवू शकला. ते १० लाख रुपये आहेतच. हे पैसे तुम्ही चांगल्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये गुंतवू शकता. यात एसआयपी एक सुंदर पर्याय आहे.

सिपमध्ये १० ते १२ टक्के रिटर्न मिळतोच. त्यापेक्षाही जास्तही मिळतो. परंतू, सामान्य विचार करता २० वर्षांसाठी महिन्याला जर तुम्ही १५ हजार रुपये सिपमध्ये गुंतविले तर तुमचे ३६ लाख रुपये गुंतविले जातात. १० लाख बाजुलाच राहिले. फक्त १५ हजार रुपयांत तुम्ही २० वर्षांनी दीड कोटी रुपये कमवू शकता. १५ टक्क्यांच्या सिपमध्ये पैसे गुंतविले तर त्यातून तुम्हाला 2.28 कोटी रुपयांचा फंड जमा करता येतो.

जर तुम्ही १० लाख रुपये एका लमसम स्कीमध्ये गुंतविले तर २० वर्षांनी तुम्ही त्यातूनदेखील करोडो रुपये मिळवू शकता. एक ते पावणे दोन कोटी रुपये जमा होतात. त्याच घरातून तुम्हाला २० वर्षांनी १.२० कोटी रुपये मिळतील.

भारतात रिअल इस्टेट ५-६ टक्क्यांनी वाढते. जसजसा फ्लॅट जुना होत जाईल तसतसा त्याची किंमतही कमी होत जाईल. म्हणजे तुमच्याकडे रेंटने राहिले तर अडीच कोटी रुपयांचा फंड तयार असेल.