कुठे द्यावा लागतो लक्झरी टॅक्स? बहुतेकांना देत असून माहित नाही, जुना आहे इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:56 IST2025-01-24T14:37:54+5:302025-01-24T14:56:36+5:30

luxury tax : आपल्यापैकी अनेकजण लक्झरी टॅक्स भरत असतील. मात्र, अजूनही अनेक लोकांना हा टॅक्स कशावर लागतो हे माहिती नाही. भारतात हा कर कधी आणि का सुरू झाला? हे माहिती आहे का?

भारतासारखी कर रचना क्विचितच एखाद्या देशात पाहायला मिळत असेल. कारण, बहुतेक देशांमध्ये एक किंवा दोन कर रचना पाहायला मिळते. आपल्याकडे उत्पन्नाव्यतिरिक्त वस्तू आणि सेवा हा वेगळा कर आहे. ज्याला आपण जीएसटी अर्थात गुड्स आणि सर्विस टॅक्स म्हणतो.

या वस्तूंच्या खरेदीवर देखील विविध प्रकारचे कर आकारले जातात. यामध्ये एक लक्झरी करही आहे. जो लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर किंवा लक्झरी सेवांच्या वापरावर लावला जातो. आता तुम्हाला वाटत असेल तर मी तर लक्झरी गोष्टी वापरत नाही. त्यामुळे मला कर भरण्याची गरज नाही. पण, यादी वाचली तर लक्षात येईल की इथं प्रत्येकजण हा टॅक्स देत आहे.

लक्झरी टॅक्स म्हणजे तुम्हाला तो स्वतंत्रपणे भरावा लागतो असं नाही. तर लक्झरी उत्पादने किंवा सेवांमध्येच तो घेतला जातो. लक्झरी कर हा एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. जो प्रामुख्याने हॉटेल्स, स्पा, सलून आणि रिसॉर्ट्स सारख्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवांवर लादला जातो. हा कर हॉटेल आणि इतर ठिकाणी दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर लागू होत नाही.

सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही हॉटेल, स्पा आणि इतर निवास यासारख्या लक्झरी सुविधा वापरत असाल तर तुम्हाला लक्झरी टॅक्स भरावा लागेल.

लक्झरी टॅक्स कायद्यानुसार, अशी एखादी वस्तू किंवा सेवा जी व्यक्तीच्या जीवनात आराम आणि आनंदासाठी असते. आता यातून प्रत्यक्ष आनंद मिळतो की नाही? हे महत्त्वाचं नाही. पण, यासाठी तुम्हाला संबंधित कर मात्र भरावा लागतो.

उदाहरणार्थ तुम्ही केरळला फिरायला गेलात. तिथं तुम्हाला हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहायचे असेल तर तेथील हॉटेल रूमच्या भाड्यावर लक्झरी टॅक्स आकारला जाईल. हा टॅक्स सुरुवातीला २८ टक्के होता. मात्र, आता विविध राज्यांच्या मागणीनुसार तो कमी करण्यात आला आहे.

भारतात लक्झरी टॅक्सची सुरुवात हॉस्पिटॅलिटी उद्योगातून महसूल वाढवण्यासाठी झाली होती. सुरुवातीला या कराचे लक्ष्य लक्झरी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स येथे मिळणाऱ्या सुविधांवर होते. २००९ मध्ये सरकारने कर प्रणाली सुलभ करण्याच्या उद्देशाने हॉटेल निवास शुल्कावर १२.५% ​​चा फ्लॅट कर दर लागू केला. नंतर त्याचा जीएसटी अंतर्गत समावेश करण्यात आला.

क्लब सदस्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर लक्झरी टॅक्स जसे की डिपॉझिट मनी, चार्जेस, डोनेशन किंवा राज्याने अनिवार्य केलेले कोणतेही शुल्क, हॉटेल्सद्वारे त्यांच्या ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा, स्पा, ब्युटी पार्लर, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल इत्यादी सेवांवर द्यावा लागतो.