Digital Gold: डिजिटल गोल्ड म्हणजे काय? कुठे खरेदी कराल? फायदा काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:56 PM2021-08-27T12:56:40+5:302021-08-27T13:02:19+5:30

Information About Digital Gold purchase and Benefits: सोन्याची जपणूक फार करावी लागते. घरात सुरक्षित वाटत नसेल तर बँकेच्या लॉकरमध्ये वगैरे सोने ठेवावे लागते. त्यासाठी बँकेला ठरावीक शुल्क द्यावे लागते. परंतु आता एक नवा पर्याय समोर येऊ लागला आहे. डिजिटल सोन्याचा. जाणून घेऊ याविषयी...

भारतीयांना सोने या मौल्यवान धातूची फार हौस आहे. गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांमध्ये सोने पहिल्या क्रमांकावर असते. याचे कारण अडीअडचणीच्या काळात सोने मोडीत काढून त्याचे पैशांत रुपांतर करता येते. (how to invest in digital gold, know more)

मात्र, सोन्याची जपणूक फार करावी लागते. घरात सुरक्षित वाटत नसेल तर बँकेच्या लॉकरमध्ये वगैरे सोने ठेवावे लागते. त्यासाठी बँकेला ठरावीक शुल्क द्यावे लागते. परंतु आता एक नवा पर्याय समोर येऊ लागला आहे. डिजिटल सोन्याचा. जाणून घेऊ याविषयी...

जीपे, फोनपे, पेटीएम मनी, एचडीएफसी सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल इत्यादी पेमेंट सेवा व संस्था डिजिटल गोल्डच्या खरेदीची सुविधा उपलब्ध करून देतात.

सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे ग्राहक गोल्ड होल्डिंग्जच्या रूपात सोने खरेदी करू शकतात. गरजेनुसार या होल्डिंगचे सोन्याच्या नाण्यात रुपांतर करता येऊ शकते किंवा त्यांची विक्रीही केली जाऊ शकते. (Investment tips in Digital Gold)

आभासी पद्धतीने या सोन्याची खरेदी केली जाते. त्यासाठी कोणत्याही बँक लॉकरची गरज नसते. ऑनलाइन पद्धतीने खरेदी करावयाचे हे सोने खरेदीदाराच्या अकाऊंटमध्ये सुरक्षित ठेवले जाते. तुम्ही डिजिटल गोल्ड परिवर्तित केले तर सोन्याचे नाणे वा तत्सम वस्तू तुमच्या दारापर्यंत येते.

भारतात पुढील कंपनी ही खरेदीसेवा देते. तसेच सोने सुरक्षित ठेवण्याची सेवाही बहाल करते. एमएमटीसी-पीएएमपी इंडिया (सरकारी मालकीच्या मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन आणि स्विस कंपनी एमकेएस पीएएमपी यांची ही संयुक्त कंपनी आहे)

डिजिटल गोल्ड मोबाइल वॉलेट, यूपीआय आणि बँक यांद्वारे खरेदी करता येते. सुरक्षेची हमी असलेल्या व कोणतेही अतिरिक्त शुल्क नसलेल्या सेफ्टी व्हॉल्टमध्ये २४ कॅरेटचे सोने ठेवता येते.

एका क्लिकसरशी डिजिटल गोल्ड विकता येते किंवा त्याचे परिवर्तन करता येते. जेवढ्या मूल्याचे सोने विकले आहे तेवढी रक्कम लगेचच बँक खात्यात जमा होते.

Read in English