खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जाणारं केशर किती महाग आहे? कुठे होती शेती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:06 IST2025-03-09T15:03:33+5:302025-03-09T15:06:29+5:30

Kesar Price : तुम्ही अनेक जाहिरातींमध्ये केशरचा उल्लेख पाहिला असेल. पण, प्रत्यक्षात केशर किती महाग आहे? त्याची शेती कुठे केली जाते हे माहिती आहे का?

तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये हनिमूनच्या दिवशी पत्नी पतीसाठी केसरचे दूध घेऊन आलेलं पाहिलं असेल. एवढेच काय तर बॉलिवूड अभिनेते जाहिरात करत असलेल्या पान मसाल्यातही केशर असल्याचं सांगतात. केशर खूप महाग असते हे तुम्हाला माहीत असेल. पण, किती महाग? हे माहिती आहे का?

केशर हा जगातील सर्वात महाग मसाला आहे. भारताबरोबरच अफगाणिस्तान, चीन, पोर्तुगाल आणि इराणमध्येही त्याची लागवड केली जाते. भारतात केशर जम्मू आणि काश्मीरमध्ये घेतले जाते. काश्मिरी केशर जगभर प्रसिद्ध आहे. मिठाईपासून ते इतर खाद्यपदार्थांमध्ये केशरचा वापर केला जातो.

भारतात प्रामुख्याने काश्मिरी आणि इराणी केशर विकले जाते. केशरची किंमत त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. मूळ काश्मिरी केशरची किंमत 3 लाख रुपये ते 4 लाख रुपये (केसर दर) प्रति किलो आहे.

एक ग्रॅम काश्मीर केशर ॲमेझॉनवर ३५० ते ५९५ रुपयांना उपलब्ध आहे. दिल्लीची खारी बाओली ही केशराची मोठी बाजारपेठ आहे.

अलीकडेच कश्मिरी केशर उत्पादनाचा प्रयोग चिराग शिंदे-पाटील आणि क्रिश आडिया या २ तरुणांनी मुंबईमध्ये एका छोट्या शीतगृहात केला होता. यातून त्यांना ५० ग्रॅम केशरचे उत्पादन मिळाले होते.