Income tax Refund: कापला गेलेला टॅक्स परत कसा मिळवायचा? जाणून घ्या, मनातील सर्व शंका दूर करा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:39 PM 2021-11-01T12:39:35+5:30 2021-11-01T13:02:54+5:30
Income tax Refund tricks: इन्कम टॅक्स रिटर्न भरतेवेळी यंदा दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय पारंपरिक पद्धतीचा म्हणजे करपात्र उत्पन्न नसेल तर करपरतावा मिळवण्याचा आणि दुसरा पर्याय आहे कन्सेशनल टॅक्स अर्थात सवलतीतील कराचा. तुम्ही कोणता पर्याय निवडला आहे? इन्कम टॅक्स रिटर्न भरतेवेळी यंदा दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय पारंपरिक पद्धतीचा म्हणजे करपात्र उत्पन्न नसेल तर करपरतावा मिळवण्याचा आणि दुसरा पर्याय आहे कन्सेशनल टॅक्स अर्थात सवलतीतील कराचा. तुम्ही कोणता पर्याय निवडला आहे?
सद्य:स्थितीतील आयटी रिटर्न पद्धत तुम्ही जर जुन्या करपद्धतीप्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स कायद्यातील ८०सी ते ८०यू या कलमांतर्गत करबचतीच्या वजावटींशी संबंधित तपशील भरणे क्रमप्राप्त असते.
तुमच्या नियोक्त्याने पगारावरील कर कमी कापावा यासाठी या बचतींची माहिती तुम्ही भरली असेल तर त्यासंदर्भातील फॉर्म क्रमांक १६ नियोक्त्याकडे मागावा.
तुम्ही नियोक्त्याकडे ही माहिती दिली नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या वजावटींची माहिती तुम्ही भरू शकता. त्यासाठी आयटीआर-१ हा अर्ज उपलब्ध आहे.
८०सी, ८०सीसीसी, ८०सीसीडी(१), ८०सीसीडी(१बी) आणि ८०सीसीडी (२) अनेकदा ८०सी कलमांतर्गत करबचतीसाठी दावा केला जातो.
८०सीसीसी आणि ८०सीसीडी(१) अंतर्गतही करबचत केली जाऊ शकते. नॅशनल पेन्शन सिस्टीम, अटल पेन्शन योजना यात गुंतवणूक करून करबचत करता येते. वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत बचत केली जाणे गरजेचे आहे.
कलम ८०डी, ८०डीडी, ८०डीडीबी आणि ८०यू आर्थिक वर्षात २५ हजार रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा योजनेवर प्रीमियम भरल्यास इन्कम टॅक्स कायद्यातील ८०डी कलम लागू होऊन करातून ही रक्कम वजा होऊ शकते.
प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप्सवरही करदाता पाच हजार रुपयांपर्यंतच्या करवजावटीचा दावा करू शकतो.
पुढील गोष्टींच्या माध्यमातूनही करबचत करता येऊ शकते उच्च शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, भाडेकरार असल्यास, गृहकर्ज, इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज
घरामध्ये कोणी अपंग व्यक्ती असल्यास त्याची काळजी घेण्यासाठी झालेल्या खर्चावरही करबचत करता येऊ शकते. कलम ८०डीडीखाली तत्सम तरतूद आहे. मात्र, अपंग व्यक्ती स्वत:च करबचत करण्यास उत्सुक असेल तर त्यासाठी कलम ८०यू अंतर्गत तरतूद आहे.