Aadhaar Card हरवलंय?, काळजी करू नका; घर बसल्या 'असं' मिळेल नवं कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:20 PM2021-03-22T15:20:15+5:302021-03-22T15:27:13+5:30

how to get duplicate Aadhaar Card Online: पाहा काय असेल आधार कार्ड मिळवण्याची प्रक्रिया

सध्या आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्रं झालं आहे. अनेक सरकारी कामांसाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.

जर अशा परिस्थितीत तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा ते गहाळ झालं असेल तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

परंतु जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही नाममात्र शुल्क देऊन तुमच्या आधार कार्डाची प्रिन्ट घरबसल्या मागवू शकता.

आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (यूआयडीएआय) यापूर्वी आधार कार्डचं ई व्हर्जन डाऊनलोड करण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर तुम्हाला ते आधार कार्ड प्रिन्ट करता येत होतं.

परंतु आता नव्या सुविधेअंतर्गत ग्राहकांना प्रिन्ट केलेलं आधारकार्ड घरबसल्या मिळू शकतं. यासाठी तुम्हाला केवळ ५० रूपये शुल्क द्यावं लागणार आहे.

सर्वप्रथम तुम्हाला आधारच्या http://www.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला My Aadhaar या सेक्शनच्या आत Get Aadhaar बा ऑप्शन पाहायला मिळेल.

त्याच्या खाली असलेल्या पर्यायांमधून Retrieve Lost or Forgotten EID/UID या पर्यायावर क्लिक करावं.

त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या काही डिटेल्स द्याव्या लागतील.

तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक, नामांकन संख्या (EID), पूर्ण नाव, नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक अशी माहिती द्यावी लागेल.

जर तुम्हाला तुमचा फोन क्रमांक द्यायचा नसेल तर तुम्ही तुमचा ईमेल आयडीदेखील देऊ शकता.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेला CAPTCHA तुम्हाला टाकावा लागेल. तसंच Seng OTP किंवा Send TOTP या ऑप्शनवर क्लिक करा.

यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP पाठवला जाईल. तर TOTP हा ऑप्शन mAADHAAR अॅपवर पाठवला जातो.

त्यानंतर तुमचं पेमेंट गेटवे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला ५० रूपये शुल्क भरावं लागेल.

तुम्ही शुल्क भरल्यानंतर स्पीड पोस्टद्वारे पुढील पंधरा दिवसांमध्ये तुमच्या आधार कार्डाची कॉपी तुमच्या घरी येईल.