आयकर रिटर्न भरल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? जाणून घ्या काय आहे प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 03:19 PM2024-08-03T15:19:48+5:302024-08-03T15:47:10+5:30

ITR Filling : ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरण्याची मुदत होती. आयकर भरल्यानंतर आपल्याला रिफंड मिळतो.

ITR Filling : ३१ जुलैपर्यंत आपण आयकर रिटर्न भरल्यानंतर आपल्याला रिफन्ड मिळतो. आता अनेकांना रिफन्डची कधी येणार या चर्चा सुरू आहेत.

आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि वर्ष २०२४-२५ साठी दंड न भरता आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ रोजी संपली आहे.

आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ जुलैपर्यंत देशभरातील ७.२८ कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.५ टक्के वाढ दिसून आली आहे. २०२३-२४ च्या मूल्यांकन वर्षात ३१ जुलैपर्यंत एकूण ६.७७ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.

अनेक करदाते आहेत जे एका वर्षात जास्त कर जमा करतात, नंतर त्यांना आयकर परतावा दिला जातो. साधारणपणे, पण अनेकांना तो परतावा किती दिवसांनी परत मिळतो याची माहिती नाही.

करदात्यांनी जर आयटी रिटर्न भरल्याच्या ४ ते ५ आठवड्याच्या आत रिफंड जमा होईल.

ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कर रिटर्नची पडताळणी कराल, तुम्हाला तुमच्या खात्यात ४ ते ५ आठवड्यांत पैसे मिळतील.

जर तुम्हाला आयकर परतावा मिळाला नसेल, तर तुम्ही आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन संबंधित माहिती मिळवू शकता. याशिवाय आयकर विभाग तुम्हाला ई-मेल आणि मेसेजद्वारेही माहिती देईल.