अब्जावधींचे मालक! रोज ३ कोटी खर्च केले तरी 'इतक्या' वर्षात संपणार मुकेश अंबानींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 01:20 PM2024-07-13T13:20:18+5:302024-07-13T13:34:23+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभरात चर्चेत आहे. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठ्या मनाने पैसा खर्च केला आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता यांचा धाकटा मुलगा अनंत मुंबईतील जिओ वर्ल्डमध्ये राधिका मर्चंटसोबत विवाहबद्ध झाला. अतिशय भव्य आणि शाही पद्धतीने या लग्नाचे आयोजन करण्यात आले आहे होते. अनंत यांच्या भव्य लग्नात अंबानी कुटुंबाने कोणतीही कसर सोडली नाही.

अनंत अंबानींच्या लग्नावर सुमारे ५,००० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे, जो मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीच्या फक्त ०.५ टक्के आहे.

सध्या अब्जाधीश मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती १,०२,११,३७,७३,००,००० (रु. १०.२१ लाख कोटी) आहे. त्यांच्यासाठी या लग्नाचा खर्च जवळजवळ नगण्य आहे.

मात्र जर मुकेश अंबानी त्यांच्या संपत्तीपैकी दररोज ३ कोटी रुपये खर्च करतील किंवा दान करत असतील तर त्यांची संपत्ती किती वर्षात संपेल? जाणून घेऊया...

जर मुकेश अंबानी यांनी त्यांच्या निव्वळ संपत्तीतून दररोज ३ कोटी रुपये खर्च केले किंवा दान केले तर त्यांची सर्व संपत्ती ३४०३७९ दिवसांत संपेल.

म्हणजे वर्षाचा विचार केला तर वर्षात ३६५ दिवस असतात. ३४०३७९ दिवसांचा वर्षांमध्ये विचार केला तर अंबानी यांना त्यांची संपत्ती संपवायला ९३२ वर्षे आणि ६ महिने लागतील.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार २०२४ मध्ये अंबानींच्या संपत्तीत आतापर्यंत सुमारे १.९८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच सुमारे १०,१०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.