Online Transaction फेल झाल्यास पाहा किती दिवसांत मिळतो रिफंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 12:47 PM2021-04-04T12:47:35+5:302021-04-04T12:51:15+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार तुमचे पैसे ठराविक वेळेत परत केले जातील.

2020-21 आर्थिक वर्षाच्या शेवटी होळी आणि रंगपंचमीच्या सुट्टीमुळे बँकांचं कामकाज बंद होतं. अशा परिस्थितीत जर आपण ऑनलाइन व्यवहार केले असतील आणि ते पूर्ण झाले नसतील तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार तुमचे पैसे ठराविक वेळेत परत केले जातील.

या कालावधीत ज्या ग्राहकांची ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स फेल झाली होती परंतु त्यांचे पैसे कापले गेले होते अशा ग्राहकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली.

यासंदर्भात एपीसीआयनं २ एप्रिल रोजी या प्रकरणी ट्वीटही केलं. यामुसार आता परिस्थिती सामान्य आहे आणि आता ग्राहक करत असलेले ट्रान्झॅक्शन्सही पूर्ण होणार आहेत.

परंतु मोठ्या संख्येत अशी लोकं आहेत ज्यांचे रिफंडची अमाऊंट अद्यापही आलेली नाही.

अशातच किती दिवसांमध्ये एनईएफटी, आरटीजीएस आणि युपीआय ट्रान्झॅक्शन्सद्वारे पैसे परत येतील असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

19 सप्टेंबर 2019 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक पत्रक जारी केलं होतं. तसंच यात निश्चित कालावधीत फेल झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे पैसे परत आले नाहीत तर बँकेला प्रत्येक दिवसाच्या हिशोबानं 100 रूपये लेट पेमेंट द्यावं लागेल असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.

रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार जर ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये ती अमाऊंट क्रेडिट झाली नाही तर T + 1 (यात T हा दिवसांच्या संदर्भात आहे) या हिशोबानं बँकेला पेनल्टी द्यावी लागेल. हाच नियम युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठीही लागू आहे.

जर तुम्ही एटीएम किंवा मिनी एटीएममधून पैसे काढले आणि तुमची कॅश आली नाही, तसंच पैसे कट झाले तर तुम्हाला पाच दिवसांच्या आत पैसे परत करावे लागतील.

तसंच पाच दिवसांच्या आत पैसे परत न आल्यास T + 5 च्या हिशोबानं दिवस + 100 अशी पेनल्टी द्यावी लागेल.

जर कार्डातून पैसे कापले गेले आणि ते लाभार्थ्याला पोहोचले नाही तर एका दिवसात ते पैसे परत येणं आवश्यक आहे. जर उशीर झाला तर T + 1 (दिवस + 100) अशी पेनल्टी लागते.

ई कॉमर्स वेबसाईटद्वारे पैसे कापले गेले तर तुम्हाला पाच दिवसांच्या आत ते पैसे मिळणं आवश्यक आहे. यासाठीबी जर उशीर झाला तर T + 1 (दिवस + 100) अशी पेनल्टी लागते.