देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी दिवसाला किती कमावतात? आकडा वाचून भोवळ येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:54 IST2025-02-12T10:52:11+5:302025-02-12T10:54:03+5:30
Gautam Adani Net Worth : उद्योगपती गौतम अदानी हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. ते देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पण, त्यांची एका दिवसाची कमाई किती आहे माहिती आहे का?

अब्जाधीश गौतम अदानी यांचे नाव माहित नाही, असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. कारण, गेल्या काही वर्षात अदानी यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अदानी जगातील १५व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. त्याचवेळी ६९.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंतआहे. पण, त्यांची एका दिवसाची कमाई माहिती आहे का?
एका मुलाखतीत अदानी यांनी त्यांच्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. गौतम अदानी दिवसाला तब्बल १६०० कोटी रुपये कमावतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी एका टीव्ही शोमध्ये अदानी यांनी सांगितले होते की, ते कधीही आकड्यांमागे धावत नाही.
१५ वर्षांचे असताना त्यांना काही कारणाने आपलं शिक्षण सोडावं लागलं. अशा परिस्थितीत ते मुंबईला आले. ४ वर्ष मुंबईत राहिल्यानंतर ते पुन्हा अहमदाबादला परतले.
मुंबईमध्ये त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मेहनतीला पर्याय नाही, हा मूलमंत्र या शहराने त्यांना दिला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (१० फेब्रुवारी) अमेरिकेच्या फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट १९७७ वर बंदी घातली. गौतम अदानी यांना त्यांच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करण्यात येत होती.