भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:29 IST2025-04-24T16:24:38+5:302025-04-24T16:29:20+5:30

शेअर बाजारातील ट्रेडिंगमधून अनेक जण चांगला पैसा मिळवतात. सुरूवातीला जॉब करत ट्रेडिंग करणारे अनेकजण पूर्णवेळ ट्रेडिंगकडे वळल्याचीही उदाहरणे आहेत. पण, तुम्हाला जर असं वाटतं असेल, तर त्यापूर्वी काही गोष्ट लक्षात घ्यायला हव्यात. त्या कोणत्या समजून घ्या...

नोकरीत गुंतून राहण्यापेक्षा घरबसल्या शेअर ट्रेडिंग करून पैसे मिळवणे हा चांगला पर्याय. परंतु अजिबात अभ्यास न करता या क्षेत्रात उडी मारू नये. यासाठी सुरुवातीला काही गोष्टींचे भांडवल तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. (How much money for full time stock trader)

यात भावनिक भांडवल हे सर्वात महत्त्वाचे आहे. यात प्रामुख्याने कितीही दबावाखाली निर्णयाची क्षमता, सातत्याने शिकण्याची तयारी आणि नुकसान सहन करण्याची मानसिकता यांचा समावेश होतो.

दुसरे म्हणजे सातत्याने उत्पन्न मिळवण्यासाठी पुरेसे आर्थिक भांडवल गरजेचे असते. उदाहरणार्थ, १० लाखांच्या भांडवलावर दरमहा ५ टक्के नफा गृहीत धरल्यास महिन्याला ५०,००० रुपयांचे उत्पन्न मिळेल. परंतु बाजारात सतत नफा मिळतोच असे नाही.

फुलटाइम ट्रेडर होण्यासाठी केवळ शेअर बाजाराचे ज्ञान पुरेसे नाही, तर शिस्त, संयम आणि सतत अभ्यास करण्याची वृत्तीही आवश्यक असते. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र फंड गरजेचा आहे.

नुकसान होण्याची शक्यता गृहित धरून आर्थिक स्थैर्य टिकवण्याची तयारी असावी लागते. तसेच, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करून स्वतःची ट्रेडिंग पद्धत विकसित करावी लागते.