एफडी तोडल्यास किती होईल नुकसान? न ठेवलेलीच बरी? किती व्याज मिळते...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:00 PM2023-12-18T12:00:38+5:302023-12-18T12:05:43+5:30

फिक्स्ड डिपॉझिट ही अशीच एक योजना. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट असेही या योजनेला म्हटले जाते.

सध्या पोस्टात गुंतवणुकीच्या चांगल्या योजना आहेत आणि त्या ग्राहकांमध्ये लोकप्रियदेखील झाल्या आहेत. फिक्स्ड डिपॉझिट ही अशीच एक योजना. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट असेही या योजनेला म्हटले जाते.

१, २, ३ आणि ५ वर्षांच्या अवधीसाठी ही योजना असते. त्यानुसार व्याजदरही वेगवेगळे असतात. सध्या ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळते. मात्र, एफडी तोडायची असेल तर मोठे नुकसान होते.

पाच वर्ष कालावधी ७.५% वार्षिक व्याज; तीन वर्ष कालावधी ७%वार्षिक व्याज; दोन वर्ष कालावधी ७%वार्षिक व्याज; एक वर्ष कालावधी ६.९%वार्षिक व्याज

खात्यात किमान एक हजार रुपये जमा करावे लागतात. कमाल मर्यादा नाही. कितीही अकाउंट उघडता येतात.

अकाउंट उघडताना लागू व्याजदर पूर्ण कालावधीसाठी लागू असेल. तिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याजाची गणना, वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट सुरू केल्याच्या सहा महिनेपर्यंत बंद करता येत नाही. सहा महिन्यांनंतर आणि एक वर्षाच्या आत बंद केल्यास जमा रकमेवर साध्या बचत खात्यावर जितके व्याज मिळते, तितकेच मिळेल. सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४ टक्के व्याज मिळते.

२, ३ आणि ५ वर्षांचे एफडी अकाउंट एक वर्षाच्या आत बंद केले तर टाइम डिपॉझिटवर सध्या लागू असलेल्या व्याजदरातून २ टक्के रक्कम कापून पैसे मिळतील. म्हणजे समजा व्याजदर ७ टक्के असेल तर तुम्हाला ५ टक्के दराने पैसे परत मिळतील. जर व्याजदर ७.५ टक्के असेल तर तुम्हाला ५.५ टक्के दराने पैसे परत मिळतील.

टॅग्स :बँकbank