तुमचे कर्जाचे ईएमआय असे करा कमी; समजून घ्या गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 16:42 IST2025-02-23T16:30:55+5:302025-02-23T16:42:07+5:30
How to Reduce EMI of Existing loan: तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि तुम्हाला जर ईएमआयकमी करायचे असेल, तर हे गणित समजून घ्या...

या वर्षात तुमच्या पगारात या किमान ९ टक्के वाढ होण्याचा अंदाज असून, १२ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर टॅक्सही लागणार नाही. त्यामुळे तुमच्या खिशात एप्रिल महिन्यात अधिक पैसे खुळखुळणार आहेत.
या पैशांचा उपयोग तुम्ही कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी केला तर तुमचा फायदा १०० टक्के होणार आहे. गृह कर्जदारांनी आपल्या व्याजाचा भार कमी करण्यासाठी अगदी किरकोळ बदल केले तरी त्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत.
आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉईंटने कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या लोकांना ईएमआय कमी करण्याचा मोह होऊ शकतो. मात्र, ईएमआय आहे तसाच ठेवल्यास फायदा होऊ शकतो.
जर तुम्ही ईएमआय आहे तसाच ठेवला, तर १ लाख रुपयांमागे तुमचे ८,११४ रुपये वाचतील आणि ईएमआय कमी केल्यास केवळ ३,४७२ रुपये वाचतील.
वाढणारा पगार, रेपो दर कपात आणि करातील सवलती याचा तिहेरी फायदा घेत गृहकर्जदारांनी ईएमआय दर महिन्याला ५ हजार रुपयांनी वाढविला, तर २५ वर्षांचा कालावधी १७ वर्षावर येईल. त्यामुळे तब्बल ९२ हप्ते वाचतील.
बहुतेक नोकरदारांना एप्रिल महिन्यात पगारवाढ व बोनस मिळतो. या अतिरिक्त रकमेचा उपयोग कर्जाचा भार कमी करण्यासाठी करा.
आता उदाहरण म्हणून तुम्ही ईएमआय पाच हजारांनी वाढवल्यास काय होईल, ते समजून घ्या. ८.२५ टक्के व्याजदराने तुम्ही ५० लाख कर्ज घेतले आहे. २०८ महिने मुदतीसाठी घेतलेल्या कर्जाचा महिन्याचा ईएमआय ४५,२६१ रुपये असेल. त्यामुळे एकूण व्याज ४४,१३,३७२ इतके होईल, तुमचे ९२ ईएमआय कमी होतील. त्यामुळे व्याजापोटी द्यायचे तुमचे २६,६५,०३४ रुपये वाचतील.