'माधवी भाभी'च्या बिझनेसला कमी समजू नका, पैसे नसतील तर सरकारही करते मदत!; जाणून घ्या डिटेल्स... By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:07 PM 2022-06-10T15:07:37+5:30 2022-06-10T15:17:00+5:30
पापड जेवणाचं चव वाढवतं. पापडाचा वापर स्वयंपाक घरात जवळपास वर्षभर होत असतो. त्यामुळेच देशात पापडाचा व्यवसाय खूप मोठा आहे. पापडाच्या उद्योगातून कशी लाखोंची कमाई करता येईल याची माहिती जाणून घेऊयात... पापड जेवणाचं चव वाढवतं. पापडाचा वापर स्वयंपाक घरात जवळपास वर्षभर होत असतो. त्यामुळेच देशात पापडाचा व्यवसाय खूप मोठा आहे. मोठमोठ्या कंपन्या पापड बनवतात आणि विकतात. पण या व्यवसायात असेही लोक प्रयत्न करू शकतात की ज्यांना विविध प्रकारचे पापड बनवण्याची रेसिपी माहित आहे.
विशेष म्हणजे सरकारकडून अशा व्यवसायासाठी कर्ज देखील उपलब्ध करुन दिलं जातं. त्यामुळे तुम्हीही पापडाचा व्यवसाय सहज सुरू करू शकता आणि त्यातून नफा कमावू शकता.
६ लाखांची गुंतवणूक देशात अनेक महिला आज घरोघरी पापड बनविण्याचा व्यवसाय करतात. भारत सरकारच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळानं (NSIC) पापड व्यवसायाचा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, एकूण ६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीनं सुमारे ३०,००० किलो पापड उत्पादन युनिट उभारलं जाणार आहे. या सेटअपसाठी २५० चौरस मीटर जमीन आवश्यक असेल.
कर्जाची सुविधा पापडाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत ६ लाख रुपयाचं कर्ज सर्वात कमी व्याजदरानं उपलब्ध करुन दिलं जातं. मुद्रा योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना आपल्या नव्या व्यवसायासाठी किंवा जुन्या व्यवसायाला आणखी वाढविण्यासाठी ५० हजारांपासून ते १० लाख रुपयांचं कर्ज मिळवता येतं. यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज दाखल करू शकता.
सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील माधवी भाभी देखील पापडच्या व्यवसायातून घरोघरी लोकप्रिय झाल्या आहेत. माधवी भाभी प्रमाणेच तुम्हीही या व्यवसायात आपलं नशीब आजमावू शकता.
कामगारांची आवश्यकता पापड बनविण्याची मशीन चालविण्यासाठी आणि तयार झालेले पापड पॅकिंग करण्यासाठी तुम्हाला कामगारांची गरज लागेल. यासाठी तुम्हाला दोन ते तीन कामगार नियुक्त करावे लागतील.
पापड बनविण्यासाठीच्या कच्च्या मालाचीही मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी लागेल. यासाठी तुम्ही एक पुरवठा साखळी तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा पापडाचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या पापडाची चव हेच तुमच्या यशाचं गमक आहे. त्यामुळे पापडाच्या चवीची काळजी घ्या.
पॅकेजिंग आणि किंमत तुम्हाला तुमच्या पापड व्यवसायात पॅकेजिंग आणि किमतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. पॅकेजिंग करताना तुमच्या ब्रँडचं नाव आणि बोधचिन्ह असायला हवं जेणेकरुन तुमच्या कंपनीची ओळख निर्माण होईल. यासोबतच किंमतीचं गणित असं आखून घ्या की ग्राहकांनाही तुमच्या प्रोडक्टची किंमत जास्त वाटणार नाही आणि तुमचा नफा देखील कायम राहील.
जर तुम्ही ६ लाख रुपयांची गुंतवणूक करुन पापड व्यवसाय सुरू करत असाल तर काही दिवसांनंतर तुम्ही १ लाख रुपयांपर्यंतची कमाई सुरू करू शकता.
किती नफा कमावू शकता? पापड व्यवसायात नफ्याची टक्केवारी जवळपास ३० ते ४० टक्के इतकी असते. अशापद्धतीनं तुम्ही दरमहा ३० ते ४० हजार रुपये सहज कमावू शकता. तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन किंवा रिटेल आणि सुपर मार्केटमध्येही तुमचे पापड तुम्ही विकू शकता.