how you can benefit from RBI Repo rates decreased
जाणून घ्या, रेपो रेट कमी झाल्याने तुम्हाला कसा होणार फायदा? By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:01 PM2019-04-04T15:01:05+5:302019-04-04T15:05:33+5:30Join usJoin usNext आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे. बँकांनी रेपो रेटमधील कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना दिल्यास हफ्ता कमी होऊ शकतो रेपो रेट म्हणजे बॅंका रिझर्व्ह बँकांकडून पैसे घेते तो दर, रेपो रेट वाढणे आणि कमी होणे याचा थेट परिणाम बॅकांना आरबीआयकडून होणाऱ्या पैशांवर होतो. आरबीआयकडून बँकांना कमी दरात पैसे उपलब्ध झाले तर साहजिकच बॅंकाही आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतात. रेपो रेट कमी झाल्याने त्याचा फायदा गृह आणि वाहन कर्जधारकांना होणार आहे. आरबीआयकडून बॅंकावर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयकडून पाव टक्क्यांनी रेपो रेट कमी केला होता पण त्यावेळी बॅकांनी व्याजदार कुठलीही कपात केली नाही आता पुन्हा एकदा रेपो रेट कमी केल्याने बँका व्याजदरात कपात करु शकतील गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे ग्राहकांना महिन्याला भरावा लागणारा EMI देखील कमी होण्यास मदत मिळेल. टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकघरकारReserve Bank of IndiaHomecar