"१-२ नव्हे तर तब्बल १०० मुलांचा मी बाप बनलोय"; प्रसिद्ध कंपनीच्या CEO चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:55 PM2024-07-31T13:55:53+5:302024-07-31T14:01:59+5:30

काही महिन्यापूर्वी जेरोधा फाऊंडर निखील कामथ यांनी ते मुलांना जन्माला घालू इच्छित नाहीत असं विधान केले होते. मुल जन्माला घालून त्यांचं १८-२० वर्षापर्यंत पालन पोषण करायचं नाही असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र टेलिग्रामच्या फाऊंडरनं एक धक्कादायक खुलासा केला आहे.

नुकतेच मला कळालं की, मी १०० हून अधिक मुलांचा बायोलॉजिकल बाप बनलोय. हे त्या माणसाला कसं शक्य आहे ज्याने कधीही लग्न केले नाही आणि एकटं राहणं पसंत केलंय असं सांगत टेलिग्राम फाऊंडर आणि सीईओ Pavel Durov यांनी त्यांच्या मॅसेजिंग अँपवर ही पोस्ट शेअर केली आहे.

Durov यांनी सांगितले की, स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून मी १२ देशांमधील १०० हून अधिक मुलांना जन्म दिला आहे. ते या मुलांचे बायोलॉजिकल पिता कसे बनले याचा खुलासा केला. जवळपास १५ वर्षापूर्वी एका मित्राने त्यांना अजब मागणी केली होती असं ते म्हणाले.

मित्राने म्हटलं की, माझी पत्नी प्रजनन समस्येकारणी मुल जन्माला घालू शकत नाही त्यामुळे तू एका क्लिनिकमध्ये स्पर्म डोनेट कर, जेणेकरून आम्हाला मुलगा जन्माला घालता येईल असं मित्राने सांगताच पावेल डुरोव हसू लागले मात्र त्यानंतर ही गंभीर समस्या असल्याचं त्यांना जाणवलं.

या समस्येबाबत डुरोव यांनी क्लिनिकला भेट दिली, तिथे त्यांना कळालं की, उच्च गुणवत्ता असणाऱ्या डोनर मटेरियलची कमतरता आहे. त्यामुळे स्पर्म डोनेट करून ते ज्या जोडप्यांना मुल होत नाही त्यांची मदत करू शकतात. त्यानंतर डुरोव यांनी तसेच केले.

२०२४ पर्यंत वेगाने पुढे जात मी स्पर्म डोनेशन करून १२ देशांमध्ये १०० हून अधिक मुलांना जन्म देण्यासाठी मदत केली. त्याशिवाय मी डोनर बनल्यानंतर अनेक वर्षानंतरही कमीत कमी एका IVF दवाखान्यात आजही मी दिलेले स्पर्म त्या कुटुंबाच्या उपयोगी पडते ज्यांना मुल हवंय असंही पावेल डुरोव यांनी सांगितले.

हे काम जोखमीचं आहे, परंतु डोनर होण्याचा मला पश्चाताप नाही. हेल्दी स्पर्मची कमतरता हा जगभरात गंभीर मुद्दा आहे. मला गर्व आहे की, मी त्यात मदत करू शकतो. पावेल डुरोव यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला १.८ मिलियनहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.

१५ वर्षापूर्वी एका मित्राच्या बायकोला मुल जन्माला घालण्यास समस्या होती. मित्राने स्पर्म डोनेट करण्याची विनंती केल्यानंतर ते स्पर्म डोनेटसाठी क्लिनिकला गेले. त्याठिकाणी तुमच्या स्पर्मची क्वालिटी चांगली आहे तुमच्या मित्राला मदत होऊ शकते असं सांगण्यात आलं होते.

त्यानंतर स्पर्म डोनेशनसाठी पावेल डुरोव राजी झाले. मात्र काही काळांनी स्पर्म डोनेट करणं बंद केल्याचेही डुरोव यांनी स्पष्ट केले. परंतु आजच्या घडीला माझे १०० हून अधिक बायोलॉजिकल मुले आहेत असं त्यांनी सोशल मीडियात जाहीर केले.

२०१२ साली भारतात रिलीज झालेल्या विकी डोनर या सिनेमाचं कथानक याच भोवती आहे. आयुष्यमान खुराना आणि यामी गौतम यांनी अभिनय केलेल्या या सिनेमात स्पर्म डोनेशनसारख्या गंभीर मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.