ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून होणार मोठा बदल, आजच जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:37 AM 2021-07-06T09:37:51+5:30 2021-07-06T09:48:45+5:30
icici bank : बँकेच्या वेबसाइटनुसार, विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांचे शुल्क 150 रुपये प्रति व्यवहार असेल. हे सर्व नियम 1 ऑगस्टपासून लागू होतील. नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) खाते असलेल्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील ही बँक 1 ऑगस्टपासून मोठे बदल करणार बचत खातेदारांसाठी (savings account holders) रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज चार्ज (ATM Interchange Charges) आणि चेक बुक (Cheque books) शुल्कामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
दरम्यान, बँकेमार्फत ग्राहकांना 4 मोफत व्यवहार करण्याची सुविधा दिली जात आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
बँकेच्या वेबसाइटनुसार, विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांचे शुल्क 150 रुपये प्रति व्यवहार असेल. हे सर्व नियम 1 ऑगस्टपासून लागू होतील.
होम ब्रँचमध्ये शुल्क लागणार नाही ऑगस्ट महिन्यापासून आयसीआयसीआय बँक ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमध्ये मूल्य मर्यादा दरमहा 1 लाख असेल. यापेक्षा जास्त असल्यास 5 रुपये प्रति1000 रुपयांवर द्यावे लागतील. तर इतर ब्रँचमध्ये दररोज 25,000 रुपयांपर्यंत रोख व्यवहारासाठी शुल्क आकारले जात नाही. 25,000 पेक्षा जास्तवर 5 रुपये प्रति 1,000 रुपये असणार आहे.
एटीएम इंटरचेंज व्यवहार बँकेच्या वेबसाइटनुसार, एटीएम इंटरचेंज व्यवहारांवरही शुल्क आकारले जाईल. दरम्यान, महिन्यातून 6 मेट्रो ठिकाणी पहिले 3 व्यवहार विनामूल्य असतील. इतर सर्व ठिकाणी महिन्यात पहिले 5 व्यवहार विनामूल्य असतील. 20 रुपये प्रति वित्तीय व्यवहार आणि 8.50 रुपये प्रति गैर-वित्तीय व्यवहारावर शुक्ल आकारले जाईल.
चेक बुक एका वर्षात 25 चेकसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या नंतर तुम्हाला अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानांच्या अतिरिक्त चेकबुकसाठी द्यावे लागतील. कॅलेंडर महिन्यातील पहिली रोख रक्कम काढण्यासाठी कोणत्याही रकमेवर शुल्क आकारले जाणार नाही, त्यानंतर फी असेल. याविषयी अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
कोठेही रोख पैसे काढणे कॅलेंडर महिन्यात प्रथम पैसे काढण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यानंतर तुम्हाला दरमहा पाच रुपये द्यावे लागतील.
पैसे जमा आणि कॅश रीसायकलर तुम्ही आयसीआयसीआय बँक शाखेत 5 रुपये प्रति हजार रुपये किंवा त्यातील भाग, किमान 150 च्या अधीन. कॅश रीसायकलर मशीनवर एक कॅलेंडर महिन्याच्या पहिल्या रोख ठेवीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही, त्यानंतर शुल्क आकारले जाईल. यासंबंधीची अधिक तपशील बँकेच्या वेबसाइटवर पाहता येईल.