IDBI Bank मध्ये नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेनं माहिती देत सागितलं राहा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 05:51 PM2021-03-20T17:51:19+5:302021-03-20T17:58:15+5:30

IDBI Bank : बँकेनं ट्वीट करत दिली माहिती

सध्या IDBI बँकेत नोकरीची संधी असल्याच्या चर्चा रंगत असल्याची माहिती समोर आली होती. परंतु ही बँकेला ही माहिती समजल्यानंतर बँकेनं ग्राहकांना सावध राहण्यास सांगितलं आहे.

IDBI बँकेत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर लोकांची फसवणूक होत असल्याचंही बँकेनं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर एक खोट्या माहितीद्वारे नोकरी देण्याचं सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे.

बँकेनं यावर स्पष्टीकरण देत त्यांनी नियुक्ती कंवा लोकांकडून पेसै घेण्यावरून कोणत्याही एजन्सीची सेवा घेतली जात नाही, असं बँकेनं नमूद केलं आहे.

तसंच अशा खोट्या मेसेजेस संदर्भात सावध राहण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे.

बँकेच्या नावाचा वापर करून फसवणूक करणाऱ्या काही व्यक्ती / नियुक्ती करणाऱ्या संस्था या आयडीबीआय बँकेच्या नावावर खोटी नियुक्ती पत्र देऊन नोकरी देण्याचं आश्वासन देत असल्याचं बँकेच्या निदर्शनास आल्याचं बँकेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

जर तुमच्याकडे असा कोणताही फोन आला तुम्ही सावध राहा आणि पूर्ण तपास केल्यानंतरच पुढील पाऊल उचला, असंही बँकेनं म्हटलं आहे.

लोकांना देण्यात येणाऱ्या नियुक्ती पत्रात बँकेचं नाव, लोगो आणि पत्त्याचाही वापर करण्यात आला आल्याचंही बँकेनं म्हटलंय.

बँकेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या बाजूनं नियुक्ती आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क, कमिशन अथवा कोणतेसे पेसे आकारण्यासाठी कोणत्याही एजन्सीची किंवा व्यक्तीची नियुक्ती केली नाही.

बँकेत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत काही लोकांना खोटे फोन कॉल येत असल्याचंही निदर्शनास आल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या लोकांपासून आणि एजन्सीपासून सावध राहा. बँकेत कोणत्याही प्रकारची नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्यास त्याची माहिती www.idbibank.in या वेबसाईटवर देण्यात येत असल्याचंही बँकेनं स्पष्ट केलं.

अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे आयडीबीआय बँकेत नोकरी देण्याच्या नावावर कोणताही फोन आला तर त्वरित इमेल अथवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन याची माहिती घेण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे .

आयडीबीआय ही एलआयसीच्या नियंत्रणातील एक बँक आहे. नुकतंय या बँकेचं नियंत्रण देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या हाती देण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं आयडीबीआय बँकेला पीसीएमधून मुक्त केलं आहे. बँकेमध्ये काही आर्थिक सुधारणा दिसल्यानंतर बँकेला यातून मुक्त करण्यात आलं.

पीसीए म्हणजे कोणतीही बँक रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली असते. या अंतर्गत बँकेला आपल्या कामकाजात त्वरित सुधारणा कराव्या लागतात. तसंच बँकेला नवी कर्ज देण्याचीही परवानगी नसते.