Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 09:03 AM 2024-10-29T09:03:39+5:30 2024-10-29T09:18:33+5:30
Gold Purchasing on Dhanteras 2024: आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, कारण सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. Gold Purchasing on Dhanteras 2024: आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, कारण सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सोन्याचा वापर तुम्ही कधीही दागिने म्हणून करू शकता, तसंच सोनं हा एक धातू आहे ज्याची किंमत काळानुसार वाढत राहते.
यामुळेच सोन्यात गुंतवणुकीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. लोक त्याला वाईट काळातील एक साथीदार समजू लागले आहेत. तुम्हीही आज धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोनं खरेदीच्या तयारीत असाल तर जाणून घ्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश का करावा. ते विकत घेण्याचे फायदे काय आहेत?
धनत्रयोदशीला सोनं खरेदी केल्यास घरात समृद्धी राहते, अशी मान्यता आहे. पण खऱ्या अर्थानं सोने हा गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे. सोन्यात गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. ज्या प्रकारे सोन्याचे भाव झपाट्यानं वाढत आहेत, अशा परिस्थितीत आज खरेदी केलेलं सोनं तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देऊ शकते. धनत्रयोदशीच्या निमित्तानं जर तुम्ही दरवर्षी थोडेसं सोनं प्रथा म्हणून खरेदी करत असाल तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी निधीची व्यवस्था करता.
कठीण काळात जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासते आणि कोठूनही पैशांची व्यवस्था करता येत नाही, तेव्हा सोनं तुमचं संकटमोचक बनतं. सोनं तारण ठेवून तुम्ही कर्ज उभं करू शकता. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीला सामोरें जाण्यासाठी सोने विकून त्या बदल्यात रोख रक्कम घेऊ शकता. सोनं ही एक अशी संपत्ती आहे जी आपण सहजपणे कुठेही सोबत नेऊ शकतो.
जर तुम्हीही या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करण्याची गरज नाही. आपण फिजिकल गोल्डऐवजी डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफचा पर्यायदेखील निवडू शकता. डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ म्हणजे काय, जाणून घ्या त्याबद्दल-
तुम्ही फिजिकल गोल्डऐवजी डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. डिजिटल सोनं आपल्याकडे शारीरिकरित्या नाही तर आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवलं जातं. काळाच्या ओघात त्याची किंमतही वाढत जाते. गरज भासल्यास तुम्ही हे सोनं ऑनलाइन ही विकू शकता. यात १ रुपयापासून गुंतवणूक करता येते. म्हणजे आपल्या खिशाची क्षमता लक्षात घेऊन तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता.
गोल्ड ईटीएफ शेअर्स म्हणून खरेदी करून डिमॅट खात्यात ठेवता येतात. ही एक म्युच्युअल फंड योजना आहे, जी सोन्यात गुंतवणुकीसाठी स्वस्त पर्याय आहे. हे सोनं शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येतं. गोल्ड ईटीएफ युनिटमध्ये खरेदी केली जातात. गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे १ ग्रॅम सोनं. जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही एक-दोन युनिट सोनंही खरेदी करू शकता.