या तीन सरकारी बँकांमध्ये खाते आहे? 31 मार्चपर्यंत आवश्यक कामे संपवा, नाहीतर... By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 09:32 AM 2021-03-09T09:32:02+5:30 2021-03-09T09:44:10+5:30
major Changes in these Government banks from 1 april 2021 : बँकांच्या वॉलेटमध्ये ज्यांना नियमित पैसे पाठविता त्यांचे अकाऊंट नंबर सेव्ह असतात, ते देखील बदलावे लागणार आहेत. IFSC Code Change: जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचेही आंध्र बँक (Andhra Bank) कॉर्पोरेशन बँक (Corporation Bank) मध्ये खाते असेल तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत सर्व कामे संपविण्याची गरज आहे.
या दोन्ही बँकांचे यूनियन बँकेमध्ये (Union Bank) विलिनीकरण होणार आहे. यामुळे अनेक महत्वाचे बदल झालेले असून ते येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
हे बदल वेळीच स्वीकारले नाहीत तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे पंजाब नॅशनल बँकही (PNB) 1 एप्रिलपासून काही बदल करणार आहे. याबाबतही तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
जर तुमचे खाते आंध्र बँक किंवा कॉर्पोरेशन बँकेत असेल तर 31 मार्चपासून तुमचा आयएफएससी कोड (IFSC code) बदलणार आहे. जुना कोड 1 एप्रिलपासून काम करणार नाही.
आंध्र बँकेच्या खातेदारांचा कोड UBIN08 आणि कॉर्पोरेशन बँकेच्या खातेदारांचा कोड UBIN09 पासून सुरु होणार आहे. याचबरोबर तुम्हाला नवीन चेकबुकदेखील घ्यावे लागणार आहे, जे युनियन बँकेचे असणार आहे. विलिनीकरण झालेल्या बँकांचा आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड बदलतो.
कसा बदलाल आयएफएससी कोड... आयएफएससी कोड बदलण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाइट www.unionbankofindia.co.in आहे. तेथे amaigamation Centre वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा आयएफएससी कोड दिसेल. तुम्ही बँकेचा कस्टमर केअर नंबर 18002082244, 18004251515 किंवा 18004253555 यावर फोन करून देखील माहिती मिळवू शकता.
आंध्र आणि कॉर्पोरेशन बँके व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनाही त्यांचा आयएफएससी कोड बदलावा लागणार आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या पीएनबीने ग्राहकांना यासाठी सूचना केलेली आहे.
1 एप्रिलपासून पीएनबीच्या ग्राहकांनी त्यांचा आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड बदलावा असे बँकेने कळविले आहे.
बँकेनुसार 31 मार्च नंतर जुने कोड काम करणार नाहीत. यामुळे पैसे ट्रान्सफर करताना अडचण येणार आहे. यामुळे नवीन आयएफएससी कोड असणे गरजेचे आहे.
याचबरोबर जे आपल्या पालकांना किंवा ग्राहकांना, डिलरना पैसे पाठवितात त्यांनी देखील त्यांच्याकडून नवीन आयएफएससी कोड घेण्याची गरज आहे. बँकांच्या वॉलेटमध्ये ज्यांना नियमित पैसे पाठविता त्यांचे अकाऊंट नंबर सेव्ह असतात, ते देखील बदलावे लागणार आहेत.