SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! बँकेनं केला मोठा बदल, खिशाला बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 07:22 PM2022-02-01T19:22:15+5:302022-02-01T19:32:02+5:30

आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून बँकेने मोठा बदल केला आहे. यानुसार, ग्राहकांना आता Online transaction साठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जर आपलेही एसबीआयमध्ये खाते (SBI customer) असेल, तर आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून बँकेने मोठा बदल केला आहे. यानुसार, ग्राहकांना आता ऑनलाइन Transaction (Online transaction)साठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

SBI ने आजपासून IMPS व्यवहारासाठी आणखी एक नवा स्लॅब जोडला आहे. याचा परिणाम थेट ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. बँकेने सर्व ग्राहकांना याची माहितीही दिली आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा स्लॅब 2 ते 5 लाखांपर्यंतचा असेल. आपण IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांचा व्यवहार केल्यास, पैसे पाठवणाऱ्या ग्राहकाला 20 रुपये प्लस GST भरावा लागेल.

IMPS सेवेच्या माध्यमाने ग्राहक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकतात. या सेवेचा लाभ 24 तास आणि 7 ही दिवस घेता योतो. बँक शाखांमधून करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी, 1,000 ते 10,000 रुपयांदरम्यानच्या व्यवहारांवर 2 रुपये + GST ​​द्यावा लागेल.

याशिवाय, 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतच्या IMPS वर 4 रुपये + GST ​​आणि 1 लाख ते 2 लाख रुपयांच्या IMPS वर 12 रुपये + GST ​द्यावा लागतो.

डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, 2 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जात नव्हते.

ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे आपण कुठेही पैसे पाठवू शकता. ग्राहक IMPS, NEFT, RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात. महत्वाचे म्हणजे NEFT आणि RTGS सुविधा वेळेनुसार उपलब्ध असेल.

RBI ने ऑक्टोबर महिन्यात IMPS व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. सरकारने अशा व्यवहारांची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली होती. म्हणजेच तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकाल. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.

एसबीआयने म्हटले आहे की, डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, आता बँक इंटरनेट बँकिंग आणि YONO सह मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन IMPS व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जाणार नाही.