SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; त्वरित करा 'हे' काम, नाहीतर अकाऊंट होईल बंद! By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:19 PM 2022-01-16T12:19:19+5:30 2022-01-16T12:28:00+5:30
SBI Customers Alert: जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बँकेनं केलंय ग्राहकांना आवाहन. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank Of India) आपल्या ग्राहकांना एक आवाहन केले आहे.
बँकेच्या दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी किंवा अखंड बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी आपल्या ग्राहकांना भविष्यात कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत.
"आम्ही आमच्या ग्राहकांना सूचना करत आहोत की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी PAN कार्ड आधार कार्डाशी लिंक करावं. ग्राहकांनी वेळीच पॅन आणि आधार कार्ड लिंक करावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची असुविधा टाळता येईल," असं स्टेट बँकेनं ट्वीटद्वारे म्हटलंय.
आधार कार्डाशी पॅन लिंक करणे अनिवार्य आहे. जर पॅन आणि आधार लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल आणि नंतर व्यवहारात समस्या निर्माण होऊ शकतात. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे.
आधारशी पॅन लिंक करण्यासाठी सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal या वेबसाईटवर जा. यानंतर Our Service वर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला Link Aadhaar हा ऑप्शन तुम्हाला दिसेल.
यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Link Aadhaar या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज खुलं होईल. त्या ठिकाणी तुमचं पॅन आणि आधार कार्डाची माहिती टाका.
संपूर्ण माहिती भरल्यानंतर 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधारशी लिंक आहे का नाही याची माहिती मिळेल.
आधार पॅन लिंक आहे का नाही हे एसएमएसद्वारेही तपासता येईल. यासाठी UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permament Account Number> लिहून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवू शकता. जर लिंक झालं असेल तर Aadhaar...is already associated with PAN असा मेसेज तुम्हाला दिसेल.