या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 9 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल; कंपनी म्हणते, तेजीचं कारण माहीत नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 06:20 PM 2022-12-13T18:20:10+5:30 2022-12-13T18:28:48+5:30
शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्समध्ये येत असलेल्या तेजीसंदर्भात स्टॉक एक्सचेन्जने उत्तरही मागितले. यावर, प्राइस मूव्हमेंटसंदर्भात आपल्याकडे कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे कंपनीने म्हटले आहे... बाजारात एसबीईसी शुगरचे (Sbec Sugar) शेअर्स गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चर्चेत आहेत. मोदी समूहाची कंपनी एसबीईसी शुगरच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून येत आहे. गेल्या 9 दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 135 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्समध्ये येत असलेल्या तेजीसंदर्भात स्टॉक एक्सचेन्जने उत्तरही मागितले. यावर, प्राइस मूव्हमेंटसंदर्भात आपल्याकडे कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे एसबीईसी शुगरने म्हटले आहे. एसबीईसी शुगरचा शेअर मंगळवारी 5 पर्सेंटच्या तेजीसह 58.20 रुपयांवर बंद झाला.
फक्त 9 दिवसांत दुप्पटहून अधिक झाला गुंतवणूकदारांचा पैसा - एसबीईसी शुगरच्या शेअर्सनी गेल्या 9 ट्रेडिंग सत्रांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 137 टक्के एवढा परतावा दिला आहे. उमेश मोदी ग्रुप कंपनीचे शेअर्स 1 डिसेंबर 2022 रोजी 24.35 रुपयांवर व्यवहार करत होते. 13 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 58.20 रुपयांवर बंद झाले.
जर एखाद्या व्यक्तीने 1 डिसेंबरला शुगर कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असेल, तर सध्याच्या स्थितीत त्याचे 2.40 लाख रुपये झाले असते.
फक्त 5 दिवसांत कंपनीच्या शेअर्सनी घेतली 34 टक्क्यांची उसळी - गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांत एसबीईसी शुगरच्या शेअर्समध्ये 34 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. कंपनीचे शेअर 7 डिसेंबर 2022 रोजी बीएसईवर 43.40 रुपयांवर व्यवहार करत होते. एसबीईसी शुगरचे शेअर 13 डिसेंबर 2022 रोजी 58.20 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत.
एसबीईसी शुगरच्या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 58.20 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 21.05 रुपये आहे. मोदी समूहाच्या या शेअरने यावर्षात आतापर्यंत जवळपास 150 टक्क्यांची उसळी घेतली आहे. कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 278 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)