Post Office Scheme मध्ये तुमचा पैसा गॅरेंटीसह होईल दुप्पट; केवळ इतके महिने लागतील, ट्राय करून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:19 IST2025-03-13T09:05:04+5:302025-03-13T09:19:11+5:30

आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी सर्वांनाच आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी असं वाटत असतं.

आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी सर्वांनाच आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी असं वाटत असतं. जर तुम्ही नो रिस्क इन्व्हेस्टमेंटचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी सर्वात परफेक्ट आणि बेस्ट ठरू शकते. सध्या त्यावर वार्षिक ७.५ टक्के व्याजदर मिळत आहे.

जर तुम्हाला नो रिस्क इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. ही योजना ११५ महिन्यांत (९ वर्षे ७ महिने) पैसे दुप्पट करण्याची हमी देते.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (केव्हीपी) योजनेवर सुमारे ७.५% वार्षिक व्याज मिळतं, जे केवळ ११५ महिन्यांत (९ वर्षे आणि ७ महिने) आपली गुंतवणूक दुप्पट करते. सुरक्षित, खात्रीशीर आणि उत्कृष्ट परताव्यासाठी ही सरकारी योजना उत्तम पर्याय आहे.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. परंतु तुम्ही १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ही लवचिकता लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय बनवते.

या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अर्ज अशी कागदपत्रं आवश्यक आहेत. कोणतीही प्रौढ व्यक्ती (एकट्याने किंवा संयुक्तपणे) खातं उघडू शकते.

या योजनेवरील वार्षिक व्याजदर सध्या ७.५ टक्क्यांच्या आसपास आहे, जर तुम्ही यात ₹५ लाख गुंतवले तर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळेल, म्हणजेच ११५ महिन्यांसाठी ५ लाख रुपये गुंतवल्यानंतर तुमचा एकूण फंड मॅच्युरिटीवर १० लाख रुपयांपर्यंत जाईल. त्यावर ५ लाखांचं केवळ व्याजच मिळणार आहे.

ही १००% सरकारी हमी योजना आहे. ज्यामध्ये आपण कोणत्याही जोखमीशिवाय सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला खात्रीशीर परतावा हवा असेल तर ही योजना तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.