Income Tax Day: SBI आपल्या ग्राहकांना देतेय १९९ रूपयांत CA ची सुविधा; पाहा कसा घेऊ शकता लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 02:29 PM 2021-07-24T14:29:10+5:30 2021-07-24T14:32:54+5:30
Income Tax Day : इन्कम टॅक्स दिनानिमित्त स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी आणली जबरदस्त ऑफर. पाहा कसा घेता येणार लाभ. इन्कम टॅक्स विभागानं इन्मक टॅक्स दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ग्राहकांना Yono App वर Tax2Win द्वारे आपला इन्कम टॅक्स रिटर्न मोफत भरता येणार आहे. याशिवाय जर इन्मक टॅक्स रिटर्न करताना जर सीएची मदत लागली तर त्यासाठी केवळ १९९ रूपये आकारले जाणार आहेत.
सामान्य दिवसांमध्ये सीएची फी ५४९ रूपये इतकी असते. परंतु आयकर दिनाच्या निमित्तानं यामध्ये स्टेट बँकेनं सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Tax2win हा करदात्यांसाठी एक ई फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे सहजरित्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येतो.
स्टेट बँकेनं Tax2win सोबत केलेल्या करारामुळे या सुविधेचा ग्राहकांना लाभ घेता येत आहे. पाहा याचा कसा तुम्ही वापर करू शकता.
सर्वप्रथम SBI YONO अॅपवर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Shop and Order या पर्यायावर क्लिक करा.
या पर्यायवर क्लिक केल्यानंतर एक नवं पान सुरू होई. त्याठिकाणी view all या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला Tax And Investment हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Tax2Win हा ऑप्शन दिसेल.
Tax2Win वर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला आयटीआर आणि सीएचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्ही सीएचा ऑप्शन निवडून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
२०२० मध्ये इन्कम टॅक्स विभागानं इन्कम टॅक्स दिवसाची सुरूवात केली होतीय यामागे एक विशेष कारणही होतं. तेव्हा इन्कम टॅक्स विभागाला १५० वर्षे पूर्ण झाली होती. १८६० मध्ये ब्रिटीशांनी याची सुरूवात केली होती.