हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
१०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
आजच्या काळात अशी अनेक माध्यमं आहेत ज्याद्वारे मुलंही भरपूर पैसा कमावतात. टीव्हीवरील सर्व टॅलेंट शोपासून ते यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत मुलं भरपूर पैसे कमवत आहेत.