सहा महिन्यांत ₹47,29,57,02,35,000 चे बिल! भारताचा सर्वाधिक पैसा कोणत्या देशात जातोय? By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:44 PM 2024-10-17T16:44:56+5:30 2024-10-17T16:49:23+5:30
India-China Trade : कोण आहेत भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार? पाहा... India-China Trade : भारत आणि चीनमध्ये सीमेवर अनेक वर्षांपासून तणाव आहे, मात्र दोन्ही देशांच्या व्यापारावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. या वर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान चीन भारताचा सर्वात मोठा आयातदार म्हणून उदयास आला आहे. या काळात चीनमधून एकूण $56.29 अब्ज किमतीची आयात करण्यात आली आहे.
तर, याच कालावधीत अमेरिका भारतासाठी सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. अमेरिकेतील निर्यात 5.62 टक्क्यांनी वाढून $40.38 अब्ज झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चीनमधून आयात 11.5 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 50.48 अब्ज डॉलरची आयात झाली होती.
आकडेवारीनुसार, या कालावधीत भारतातील आयातीचे शीर्ष 10 स्त्रोत चीन, रशिया, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, इराक, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि सिंगापूर होते.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत रशियाकडून आयात $32.18 अब्ज झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत $30.43 अब्ज होती. तर, UAE मधील आयात $31.46 अब्ज झाली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच काळात $20.70 अब्ज होते.
या कालावधीत देशाचे शीर्ष 10 निर्यात स्त्रोत यूएस, यूएई, नेदरलँड्स, यूके, चीन, सिंगापूर, सौदी अरेबिया, बांगलादेश, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत UAE मधील निर्यात $17.24 अब्ज झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत $15.47 अब्ज होती. तर, चीनला केलेली निर्यात $ 7.63 अब्ज होती, जी गेल्या वर्षी $ 6.91 अब्ज झाली.
विशेष म्हणजे, 2023-24 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. त्यानंतर चीनचा नंबर होता. 2013-14 ते 2017-18 आणि 2020-21 मध्ये चीन भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार होता. चीनपूर्वी UAE हा देशाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. तर, 2021-22 आणि 2022-23 मध्ये अमेरिका सर्वात मोठा व्यापार भागीदार होता.