India Economy: भारतात वेगाने वाढतेय खासगी संपत्ती, दहा वर्षांनंतर भारत असेल जगात अव्वस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:52 AM2022-04-01T11:52:38+5:302022-04-01T12:09:20+5:30

India Economy: जगात सर्वाधिक वैयक्तिक खासगी संपत्ती अमेरिकेमध्ये आहे. मात्र येणाऱ्या दहा वर्षांत या बाबतीत भारत अव्वलस्थानी असेल, असा अंदाज आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्टच्या रिपोर्टनुसार यावर्षी जगातील सर्वाधिक वैयक्तिक संपत्ती असलेले दहा देश पुढील प्रमाणे आहे.

जगात सर्वाधिक वैयक्तिक खासगी संपत्ती अमेरिकेमध्ये आहे. मात्र येणाऱ्या दहा वर्षांत या बाबतीत भारत अव्वलस्थानी असेल, असा अंदाज आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्टच्या रिपोर्टनुसार यावर्षी जगातील सर्वाधिक वैयक्तिक संपत्ती असलेले दहा देश पुढील प्रमाणे आहे.

अमेरिकेमध्ये ५५ लाख ४७ हजार २०० कोट्यधीश आहेत. त्यातील २ लाख ४३ हजार ५२० अब्जाधीश आणि ८१० खर्वाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण ६८८ खर्व डॉलर एवढ्या संपत्तीचा संचय आहे.

चीनमध्ये ८ लाथ २३ हजार ८०० कोट्यधीश आहेत. यामधील २ हजार १२७ अब्जाधीश आणि २३४ खर्वाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण २३३ खर्व डॉलर एवढी संपत्ती आहे.

जपानमध्ये कोट्यधीशांची संख्या १३ लाख ८० हजार ६०० एवढी आहे. यामध्ये ८३२ अब्जाधीश आणि २६ खर्वाधीस आहेत. त्यांच्याकडे एकूण २०१ खर्व डॉलर एवढी संपत्ती आहे.

भारतामध्ये ३ लाख ५७ हजार करोडपती आहेत. यामध्ये ११४९ अब्जाधीश आणि १२८ खर्वाधीश आहेत. या सर्वांकडे एकूण संपत्ती ८९ खर्व डॉलर एवढी आहे.

जर्मनीमध्ये ७ लाख ४६ हजार ६०० कोट्यधीश आहेत. यातील ९९६ अब्जाधीश आणि ७६ खर्वाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण ८९ खर्व डॉलर एवढी संपत्ती आहे.

युनायटेड किंग्डममध्ये ७ लाख ३७ हजार ६०० कोट्यधीश आहेत. त्यातील १ हजार ४१ अब्जाधीश आणि ९२ खर्वाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण ८८ खर्व डॉलर एवढ्या संपत्तीचा संचय आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ३ लाख ९५ हजार ४०० कोट्यधीश आहेत. त्यामधील ऑस्ट्रेलियामध्ये ४७७ अब्जाधीश आणि ३८ खर्वाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६४ खर्व डॉलर आहे.

कॅनडामध्ये ३ लाख ६४ हजार १०० कोट्यधीश आहेत. यामधील ५२४ अब्जाधीश आणि ४३ खर्वाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण मिळून ६२ खर्व डॉलर एवढी संपत्ती आहे.

फ्रान्समध्ये कोट्यधीशांची संख्या २ लाख ६४ हजार एवढी आहे. यामधील ३४३ अब्जाधीश आणि ३६ खर्वाधीश आहेत. सर्वांकडे एकूण ५८ खर्व डॉलर एवढी संपत्ती आहे.

इटलीमध्ये दोन लाख ६०० कोट्यधीश आहेत. २७३ अब्जाधीश आमि २८ खर्वाधीशसुद्धा आहेत. त्यांच्याकडे एकूण ३८ खर्व डॉलर एवढी संपत्ती आहे.