भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 04:58 PM 2023-09-06T16:58:24+5:30 2023-09-06T17:06:08+5:30
भारताने काही दिवसांपूर्वीच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यानंतर, आता जगात सर्वाधिक मोबाईल युजर्सचा देशही भारतच बनला आहे. भारताने काही दिवसांपूर्वीच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यानंतर, आता जगात सर्वाधिक मोबाईल युजर्सचा देशही भारतच बनला आहे.
मोबाईल सबस्क्रिप्शनमध्ये भारत जगभरातील प्रमुख देश बनला आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ७ मिलियन्सपेक्षा अधिक नवीन मोबाईल ग्राहकांसह भारत हा जगातील सर्वाधिक मोबाईल सदस्यता असलेला देश बनला आहे.
या यादीत भारताने चीनला मात दिली असून चीन सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत जगभरातील ५ जी मोबाईल युजर्संच्या संख्येने १.३ बिलियन्सचा आकडा पार केला आहे.
एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट अनुसार, भारताने मोबाइल सब्सक्रिप्शन मध्ये दुसऱ्या तिमाहीत ७ मिलियन (१० लाख) पेक्षा अधिक नवीन ग्राहकांना जोडले आहे.
या यादीत चीन ५० लाख नव्या ग्राहकांसह दूसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका ३० लाख नवीन मोबाइल युजर्संसह तिसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या तिमाहीत १७५ मिलियन्स नवीन ५जी सब्सक्रिप्शन जोडण्यात आले आहेत.
जगभरातील ५ जी तंत्रज्ञान व सेवेची मागणी वाढली असून तिसऱ्या तिमाहित १.३ बिलियन्सच्या जवळ ही संख्या पोहोचली आहे. आता, जगभरातील मोबाईल सबस्क्रिप्शनची संख्या ८.३ बिलियन्सपर्यंत पोहोचली आहे.
ज्यामध्ये केवळ दुसऱ्या तिमाहीत ही संख्या ४० मिलियन्स एवढी वाढली आहे. जागतिक स्तरावर आता ६.१ बिलियन्स युनिक मोबाईल ग्राहक बनले आहेत.
भारताने यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत ७ मिलियन्सपेक्षा अधिक नवे मोबाईल ग्राहक जोडले आहेत. त्यामुळे, भारत मोबाईल खरेदीच्या व युजर्संच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
५जी सेवेसह ४ जी युजर्संची संख्याही वाढली आहे. दुसऱ्या तिमाहीत ४ जी सबस्क्रिप्शनच्या संख्येतही ११ मिलियन्सची वाढ झाली आहे. त्यामुळे, ४ जी सबस्क्रिप्शनची संख्या आता ५.२ बिलियन्सवर जाऊन पोहोचली आहे.
जगभरातील एकूण मोबाईल सबस्क्रिप्शनमध्ये ४ जी मोबाईल सबस्क्रिप्शन ग्राहकांची संख्या ६२ टक्के एवढी आहे.