भारतातील श्रीमंत जे स्वत:च होते वर्ल्ड बँक; 'जगत शेठ' होते सर्वात श्रीमंत व्यक्ती, इंग्रज आणि मुघलही घ्यायचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:35 AM2024-07-04T08:35:54+5:302024-07-04T09:03:26+5:30

१८ व्या शतकात फतेहचंद खूप मोठे उद्योगजक होते. जगत शेठ या नावाने ते ओळखले जायचे. त्यांच्याकडे त्या काळी ८.३ लाख रुपयांची संपत्ती होती.

१८ व्या शतकात फतेहचंद खूप मोठे उद्योगजक होते. जगत शेठ या नावाने ते ओळखले जायचे. त्यांच्याकडे त्या काळी ८.३ लाख रुपयांची संपत्ती होती. आजच्या घडीला ती १ ट्रिलियन डॉलर म्हणजेच १० लाख कोटी डॉलर्सच्या बरोबरीने आहे.

१७२३ मध्ये मुघल बादशाह महंमद शाहने फतेहचंद यांना 'जगत शेठ' ही पदवी दिली. जगत शेठ हे बंगालमधील सर्वात श्रीमंत बँकर होते. त्या काळी इंग्रजही त्यांच्याकडून कर्ज घेत, यावरून जगत शेठ हे तेव्हा किती श्रीमंत होते याची प्रचिती येते.

जगत शेठ यांचं कुटुंब ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज आणि आर्थिक मदत करत असे. हे कुटुंब आर्थिक कौशल्यासाठी ओळखलं जात होतं. जगत शेठ यांनी मुघल साम्राज्यालाही मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं. ब्रिटिश इतिहासकार रॉबर्ट ऑर्मे यांनी जगत शेठ यांच्या कुटुंबाचं वर्णन आपल्या काळातील सर्वात श्रीमंत हिंदू कुटुंब म्हणून केलं.

जगत शेठ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने बंगाल सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कर संकलन आणि स्वत:चं चलन तयार करण्याचंही काम सांभाळलं. जगत शेठ घराण्याची संपत्ती संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यापेक्षा जास्त होती, असं काही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

जगत शेठ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने बंगाल सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कर संकलन आणि स्वत:चं चलन तयार करण्याचंही काम सांभाळलं. जगत शेठ घराण्याची संपत्ती संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यापेक्षा जास्त होती, असं काही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

जगत शेठ हे १८ व्या शतकातील एक महान उद्योगपती आणि बँकर तर होतेच पण ते अनेकांना मदतही करत होते. त्यांनी बंगालची अर्थव्यवस्था आणि समाज घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मुर्शिदाबादमध्ये 'जगत शेठ का महल' हा राजवाडा, कोलकात्यात 'जगत शेठ बाजार', जगत शेठ यांच्या नावाने अनेक शाळा, रुग्णालयं आणि धर्मादाय संस्था आहेत. ते एक कुशल वाटाघाटीकार देखील होते, जे नेहमीच आपल्या हितसंबंधांचं रक्षण करण्यात यशस्वी झाले.